Onion Market
Onion MarketAgrowon

Attack on Onion Traders : नगरमध्ये कांदा व्यापाऱ्यावर हल्ला; लाखोंची रक्कम लुटली, दरोडेखोर फरार

Attack on Onion Traders At Ahmednagar : अहमदनगरमध्ये एका कांदा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून तब्बल ५० लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे. यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Published on

Pune News : नगरमध्ये एका कांदा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत ५० लाख रूपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली. ही घटना शविवारी (ता.७) नेप्ती कांदा मार्केट समोर घडली असून समीर सय्यद असे कांदा व्यापाऱ्याचे नाव आहे. दरोडेखोरांनी व्यापार्‍यावर धारदार शस्त्राने वार केल्याने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेप्ती बाजार समितीत आज कांद्याचा लिलाव असल्याने शेतकऱ्यांना ५० ते ६० लाख रूपये द्यावे लागतात. यासाठी आडत आणि कांदा व्यापारी समीर सय्यद यांनी ५० लाखांची रोकड काढली होती. सय्यद हे नेप्ती मार्केटच्या समोरील बायपासने सकाळी ११ च्या सुमारास येत होते. यावेळी त्यांना काही दरोडेखोरांनी घेरले. तसेच त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांच्याकडील रोख ५० लाखांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. तर व्यापारी सय्यद यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Onion Market
Onion Buffer Stock : ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या कांदा विक्री नफ्यात शेतकऱ्यांना वाटा द्या; कांदा उत्पादक संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी

भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे नगर जिल्ह्यासह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी व्यापारी सय्यद यांची भेट घेतली. तर पोलिसांनी तातडीने दरोडेखोरांचा शोध घ्यावा. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा आमदार जगतापांसह कर्डीले यांनी दिला आहे. यानंतर पोलिसांनी तपास जलद केला आहे...

Onion Market
Kolhapur Onion Market : काद्यांची आवक वाढली दरावर किंचीत परिणाम, कोल्हापूर बाजारपेठेत अशी आहे स्थिती
तातडीने कारवाई व्हावी : कर्डीले भर दिवसा एखाद्यावर असा हल्ला होत आहे. यामुळे आज एसपींची भेट घेतली. तसेच तातडीने या प्रकरणाचा तपास करत आरोपींना तातडीने अटक करा. दोषींवर कारवाई करण्याबरोबर गेलेली रक्कमम मिळावी अशी मागणी केली आहे. जर पोलिसांनी योग्य तपास केला नाही. तर आम्ही रस्त्यावर उतरू.
-शिवाजी कर्डीले, भाजपचे माजी मंत्री
...तर रास्तारोको आंदोलन करू : आमदार जगताप बाजार समिती परिसरात सातत्याने छोट्या मोठ्या घटना घडत आहेत. पण आता व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. सुदैवाने यात व्यापाऱ्याचे प्राण वाचले आहेत. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याघटनेनंतर नेप्ती मार्केटमधील व्यापारी, मार्केट कमिटीचे पदाधिकारी भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तपास करण्याबरोबरच आरोपींवर योग्य ती कारवाई व्हावी. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.
- आमदार संग्राम जगताप. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com