Gram Panchayat Election : विदर्भातील ४६२ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

Gram Panchayat Election Result Update : विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये रविवारी (ता.५) ग्रामपंचायींकरीता मतदान झाले. त्यानंतर सोमवारी (ता.६) बहुतांश ग्रामपंचायतींचे निकाल दुपारपर्यंत जाहीर झाले होते.
Grampanchayat
GrampanchayatAgrowon

Nagpur News : विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये रविवारी (ता.५) ग्रामपंचायींकरीता मतदान झाले. त्यानंतर सोमवारी (ता.६) बहुतांश ग्रामपंचायतींचे निकाल दुपारपर्यंत जाहीर झाले होते.

नागपूर जिल्ह्यात सर्वच्या सर्व ३५७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर सर्वाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेस-भाजप या प्रमुख पक्षांनी दावेदारी करीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.

Grampanchayat
Land Record : जुने दस्त शोधण्यासाठी ‘ई-सर्च २.१’ प्रणाली सुरू

नागपूर जिल्ह्यात ३५७ ग्रामपंचायतींकरीता निवडणूक झाली. दुपारी चार वाजेपर्यंत यातील ३५७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले होते. यवतमाळ जिल्ह्यात ३१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक, तर २२ करीता पोट निवडणूक घेण्यात आली.

या सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले होते. अमरावती जिल्ह्यात २० सार्वत्रिक, तर ५० ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यातील चिखलदरा तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या निकालाचा कल उशिरापर्यंत कळू शकला नाही. या भागात संपर्क यंत्रणेचा अभाव असल्याने त्या भागातील निकालांना उशिरा लागणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले.

Grampanchayat
Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गटाचे वर्चस्व

चंद्रपूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले होते. गडचिरोली जिल्ह्यात २४ सार्वत्रिक, तर तीन ग्रामपंचायतींकरीता पोटनिवडणूक झाली. या सर्व निवडणुकांचे निकाल सोमवारी (ता.६) जाहीर झाले. त्या-त्या तहसील कार्यालयावर मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.

यावेळी विजेता उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. गुलाल उधळत आनंद साजरा करण्यात आला. विदर्भात निवडणूक तसेच मतमोजणीच्या दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र या निवडणुकीत सर्वच पक्षांनी विजयाचे दावे केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com