Maharashtra Agriculture: पोषक वातावरणामुळे कृषी विभागावर जबाबदारी

Pre-Kharif Review Meetings: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीपपूर्व आढावा बैठकीत शेतकऱ्यांसाठी वेळेत कर्ज, खत, बियाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : शेतकरी हा राज्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. राज्याच्या विकासदरात ११ टक्के वाटा असला तरी ४५ टक्के नागरिकांचे उपजीविका शेतीवर आहे. यंदा मॉन्सूनचा पाऊस चांगला होण्याचा अंदाज आहे. उत्पादन आणि उत्पादकतेतील वाढीसाठी वेळेत कर्ज, खते, बियाण्यांचा पुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे नेटाने काम केले पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीपपूर्व आढावा बैठकीत दिल्या.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत गांभीर्य नसलेल्या अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. तसेच कृषी विभागाने प्रकाशित केलेल्या विविध प्रकाशनांवर शेतकऱ्यांचा पारंपरिक वेशातील छायाचित्र छापले होते. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी कोट घालून आले होते.

CM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: सिंचन प्रकल्प आणि पोकरा योजना विदर्भाचा चेहरा बदलणार?

हा धागा पकडून तुम्ही टाय कोट घालता मग शेतकरी पागोट्यात का, असा मिश्किल सवाल त्यांनी केला. तसेच यापुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केल्यास पीकपद्धतीतही बदल करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis: पंढरपुरात तीन महिन्यांत कॉरिडॉरचे काम सुरू होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू लागवड, नुकसानीची मदत, एक रुपयातील विमा आदी योजनाचा आढावा घेतला. राज्यातील विविध ठिकाणच्या खतांच्या रेकची मागणी विभागीय आयुक्तांनी केली. छत्तीसगढ, तमिळनाडूतील काही रेकबरोबर आणखी वाढीव रेक वाढविण्याची मागणी आयुक्तांनी केली.

‘दोघे मिळून फडणवीस यांना शेती घेऊन देऊ’

अजित पवार यांनी बैठकीत तुफान फटकेबाजी केली. बैठकीत अधिकारी मोबाइलचा वापर करत असल्याने त्यांना चांगलेच सुनावले. तसेच तुम्हाला वाटत असेल की आम्हाला काही कळत नाही तर मी शेतकरी आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे आधी ठाण्यात काम करायचे आता अधूनमधून दरे या गावी जाऊन शेती करतात. आता आम्ही दोघे मिळून मुख्यमंत्री फडणवीस यांना शेती घेऊन ती करायला लावणार आहे, असे मिश्किल वक्तव्य करताच बैठकीत हशा पिकला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com