
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शी आणि घोटाळे होण्यासापासून रोखण्यासाठी नवीन धोरण सुरू केले आहे. घोटाळेबाजांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा बँकेने आता ''व्हिसल ब्लोअर'' धोरण लागू केले आहे. याअंतर्गत बँकेतील गैरकारभाराची माहिती कळवल्यास संबंधित तक्रारदारास १ हजार ते जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. माहिती देणाऱ्यांचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी परिपत्रकाद्वारे दिली.
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 'सांगली जिल्हा बँकेत मागच्या काही महिन्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून झालेल्या गैर कारभाराच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये शासनाच्या अनुदानापासून ते खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारल्याचे प्रकार घडले आहेत. याप्रकणी बँकेने तत्काळ कारवाई करत अपहाराची रक्कम काही प्रमाणात वसूल केली तसेच गैरकारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली'.
बँकेत ठेवलेल्या सोने तारणातही यापूर्वी गैरकारभार झाल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांवर, त्यांच्या कारभारावर सामान्य नागरिक, खातेदार वॉच ठेवू शकणार आहे. बँकेच्या कोणत्याही शाखेत कसल्याही प्रकारचा अपहार, धोरणबाह्य कामकाज व अन्य प्रकारांचा कोणताही गैरकारभार होत असेल, तर याची माहिती, तक्रार बँकेच्या सांगलीतील मुख्यालयात अथवा बँकेच्या मेलवर करता येणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
या तक्रारीची खातरजमा करून यात तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या गैरकारभार किती रकमेचा व मोठा आहे, त्यांचे स्वरूप काय आहे. यावर माहिती देणाऱ्यास एक हजारपासून दहा हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्यात येणार आहे.
सांगली जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जिल्हा बँकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. संचालक मंडळाने बँक व्यवहारात पारदर्शकता आणणेसाठी व्हिसल ब्लोअर धोरण मंजूर केले आहे. सदर धोरणानुसार बँकेच्या कर्मचाऱ्यांवर वॉच राहणार आहे. या धोरणांमुळे तक्रारी वाढल्या, तरी त्यात बँकेचाच नफा असणार आहे. हे सर्व कामकाज पाहण्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येईल.’ अशी माहिती वाघ यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.