ST Bus News : एसटीची दरवाढ ही गरीब जनतेची लूट; विजय वडेट्टीवारांची सरकारवर जोरदार टीका

Vijay Wadettiwar : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका, ओबीसी समाज हे सहन करणार नाही. असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
ST Bus News
ST Bus Newsagrowon
Published on
Updated on

Maharashtra ST Bus Rate : एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला, कामगार एसटीने प्रवास करत असतात. परंतु या लोकांनाच हे सरकार वेठीस धरण्याचे काम करत आहे. एसटी महामंडळाकडून सध्या एसटीच्या दरात केलेली दरवाढ मागे घ्यावी. अशी मागणी काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शनिवार (ता.२५) नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

वडेट्टीवार म्हणाले की, "एसटीमध्ये भ्रष्टाचार होत आहे. बस खरेदीचे कंत्राट आता सरकारने रद्द केले. एसटी महामंडळात होणाऱ्या भ्रष्टाचाराला सरकार खतपाणी घालत आहे. ह्यात एसटीचा तोटा होत नाही का? याचा भार गोरगरीब, सामान्य जनतेवर सरकार का लादत आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. एसटी दरवाढ ही गरिबांची लूट आहे. सरकारने केलेली ही दरवाढ मागे घ्यावी. अशी जोरदार टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. यावेळी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवले पाहिजे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० हजार जागा या ओबीसींच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, असे झाले तर ओबीसी समाज हे सहन करणार नाही" असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला.

"बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराड याच्या एका मागून एक प्रॉपर्टी समोर येताना इडी, सीबीआय तपास का करत नाही. कराडची प्रॉपर्टी जप्त केली तर त्याचा आका जो मंत्री आहे त्याची प्रॉपर्टी जप्त होईल, सरकारची अशी काय मर्जी कराडवर आहे" असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

४ वर्षांनी भाडेवाढ

एसटीच्या तिकींटामध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेल, टायर, चोरीस या किंमतीत बदल झाला आहे. महागाईदेखील वाढली आहे. त्यामुळे एसटीच्या तिकींटामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.४ वर्षांनी पुन्हा एकदा एसटीच्या तिकीटांमध्ये वाढ झाली आहे.

५ हजार लालपरी धावणार रस्त्यावर

एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाकडून अंतर्गत पंचवार्षिक नियोजन तयार करण्यात येणार आहे. यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्वावर बसेस न घेण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. तसेच उत्पन्नाचं ठराविक उद्धिष्ट देखील ठेवण्यात आलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com