Illegal Construction
Illegal ConstructionAgrowon

Illegal Construction: अनधिकृत बांधकामे स्वत:हून काढून घ्या

Smart City Action: महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील रस्त्यांची हद्द तसेच रस्त्याची इमारत रेषा व नियंत्रण रेषा सीमांकन करण्यासाठी येणाऱ्या यंत्रणेला नागरिकांनी सहकार्य करावे.
Published on

Chhatrapati Sambhajinagar: महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील रस्त्यांची हद्द तसेच रस्त्याची इमारत रेषा व नियंत्रण रेषा सीमांकन करण्यासाठी येणाऱ्या यंत्रणेला नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच सीमांकनाने बाधित होणारी अनधिकृत तसेच अतिक्रमित बांधकामे नागरिकांनी स्वत:हून काढून घेत यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील रस्त्यांवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित,

Illegal Construction
Warehouse Construction: सरकार धानाचे नुकसान टाळण्यासाठी करणार गोदामांची उभारणी; शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ

सिडकोचे प्रशासक जगदीश मिनीयार, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सह महानियोजनकार रवींद्र जायभाये, तहसीलदार सुनंदा पारवे आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त तथा महानगर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलिस आयुक्त शहर,

पोलिस अधीक्षक ग्रामिण यांची छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील मुख्य रस्ते (राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्ग) या वरील असलेली अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे निष्कासित करण्याच्या अनुषंगाने संयुक्त बैठकीत चर्चा झाली.

Illegal Construction
Food Waste Construction: टाकाऊ अन्नपदार्थांपासून मजबूत बांधकाम : आयआयटी इंदूरच्या संशोधकांचा नवा शोध

या वेळी महानगर नियोजनकार श्री. बाविस्कर यांनी छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री व पैठण या पाच तालुक्यांतील ३११ गावांचा समावेश प्राधिकरण क्षेत्रात असून प्राधिकरण क्षेत्रातून महत्त्वाचे रस्ते जात असल्याचे सांगितले. प्राधिकरणाचे रस्ते व रस्त्यांवरील अतिक्रमणांबाबतची सद्यःस्थितीची माहिती दिली.

श्री. पापळकर म्हणाले, की छत्रपती संभाजीनगर शहराच्या औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने व जिल्ह्यातील पर्यटनस्थळे एकमेकांशी जोडली जाणे आवश्यक आहे. तसेच नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.

Illegal Construction
Warehouse Construction : गोदाम उभारणीमध्ये वजन काटा महत्त्वाचा...

भाविक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहराला जोडल्या जाणारे सर्व मुख्य रस्ते मोकळे करण्याचे नियोजित आहे. रस्त्यांची हद्द तसेच रस्त्याची इमारत रेषा व नियंत्रण रेषा सीमांकन करण्यासाठी संबंधित यंत्रणा जसे की नॅशनल हायवे,

सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह संबंधित यंत्रणा जागेवर येणार आहेत, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच सीमांकनाने बाधित होणारी अनधिकृत तसेच अतिक्रमित बांधकामे नागरिकांनी स्वतःहून काढून घेत सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्री. पापळकर यांनी केले.

प्राधिकरण क्षेत्रात येणारे प्रमुख रस्ते

या वेळी प्राधिकरण क्षेत्रात येणारे प्रमुख रस्त्यांबाबत चर्चा झाली. यामध्ये दौलताबाद टी पॉइंट ते वेरूळ रस्ता, केम्ब्रिज शाळा ते करमाड गाव (जालना रस्ता), बाळापूर गाव ते पंढरी गाव (धुळे-सोलापूर रस्ता व बीड बायपास), गेवराई ते कौडगाव (पैठण रस्ता), छावणी हद्द ते रहिमपूर (छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्ता),

ए. एस. क्लब चौक ते रांजणगाव पोळ (घोटी रस्ता), करोडी ते पाचपीरवाडी (धुळे-सोलापूर रस्ता), ओहर ते ममनापूर (जटवाडा रस्ता), सावंगी तलाव ते बिल्डा (जळगाव रस्ता) तसेच सावंगी ते केम्ब्रिज शाळा (रा.मा. २१७) या रस्त्याचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com