Loan Recovery : वसुलीसाठी सोसायट्यांचा शेतकऱ्यांकडे तगादा

Farmer Loan Waive : अनेक महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन निधीची रक्कम जमा झाली आहे.
Loan Recovery
Loan RecoveryAgrowon

Yavtmal News : अनेक महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन निधीची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे आपले वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच नियमित शेतकऱ्यांना थकबाकी भरण्याचा तगादा सोसायट्यांनी लावला आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधीची घोषणा तत्कालिन सरकारने केली होती. या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी म्हणून दिला जात आहे. या योजनेत जिल्ह्यातील ७१ हजार ९७४ शेतकरी पात्र ठरले होते. सुरुवातीला काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम गेली. मध्यंतरी निधीसाठी शेतकरी प्रतीक्षेत होते.

Loan Recovery
Crop Loan Recovery : दुष्काळग्रस्त भागात पीक कर्ज वसुली थांबणार

जानेवारीत शासनाने प्रोत्साहन निधीचा हप्ता दिल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात गेल्याने शेतकऱ्यांचा ‘विड्रॉल’ घेतल्याशिवाय पीककर्जात ही रक्कम वळती केली जाऊ शकत नाही. त्यामुळे बँक व सोसायट्यांची अडचण झाली आहे. शेतकऱ्यांना निधी मिळाल्याने सोसायट्यांनी नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडे रक्कम भरण्याचा तगादा लावला आहे.

Loan Recovery
Loan Recovery : दुष्काळी गावांत होतेय ऊसबिलातून कर्जवसुली

पीककर्ज भरण्यासाठी मार्चपर्यंतची मुदत आहे. असे असतानाही आतापासूनच सतत फोन येत असल्याने शेतकरी कंटाळले आहेत. हा प्रकार एका सोसायटीपुरता मर्यादित नसून जिल्हाभरातच हा प्रकार सुरू आहे. मार्चमध्ये पीककर्ज भरणार आहेच, आता किमान ५० हजार रुपये भरून मोकळे व्हा, अशा शब्दांत शेतकऱ्यांना आग्रह केला जात आहे.

त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रोत्साहननिधी शेतकऱ्यांना देण्यात आल्याने, तो कर्ज खात्यात थेट वळता करता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी ‘विड्रॉल’ भरून देणे गरजेचे आहे. त्यामुळे विड्रॉल घेण्यासाठी सोसायटी सचिवांचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील पात्र ७१ हजार ९७४ ‍पैकी आतापर्यंत ७० हजार ९१० शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. अजूनही एक हजार ६४ शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

मी नियमित कर्जाची परतफेड आतापर्यंत केलेली आहे. दरवर्षी ३१ मार्चपूर्वीच पीककर्ज भरले आहे. काही दिवसांपूर्वी प्रोत्साहननिधी खात्यात जमा झाला. काम असल्याने सोसायटीत गेलो तेव्हा विड्रॉल स्लीप देण्यासाठी सातत्याने फोन येत आहेत. सध्या पैशांची आवश्यकता असल्याने ३१ मार्चपूर्वी पीककर्जाचा भरणा असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही फोन सुरूच असून, यावर निर्बंध येणे आवश्यक आहे.
- सचिन येवले, शेतकरी, कामठवाडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com