Crop Loan Recovery : पीक कर्जात व्याज वसुलीचा आग्रह नको

PDCC Bank : राज्य शासनाच्या सूचनांनुसार बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे नियमित व मुदतीत परतफेड करणाऱ्या सभासदांना केंद्र व राज्य शासनामार्फत व्याज सवलतीचा लाभ प्राप्त होतो.
Crop Loan
Crop Loan Agrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘चालू आर्थिक वर्षात २०२३-२४ च्या पीककर्ज वसूलीमध्ये फक्त मुद्दल रक्कम वसूल करावी. सभासदांकडून व्याज रकमेच्या वसुलीचा आग्रह करू नये, या बाबत संस्था पातळीवर जमा-खर्चाच्या सूचना कळविल्या जातील, असे आदेश पुणे जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून शाखाप्रमुख आणि विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शाखा प्रमुखांना काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या सूचनांनुसार बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे नियमित व मुदतीत परतफेड करणाऱ्या सभासदांना केंद्र व राज्य शासनामार्फत व्याज सवलतीचा लाभ प्राप्त होतो.

Crop Loan
Rabi Crop Loan : रब्बी पीककर्जाचे ३४१ कोटी ६९ रुपये वितरण

पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या कर्जदारांना व्याज सवलत दिली जाते. ही व्याजाची रक्कम शासनाकडे संबंधित सहकारी संस्थेद्वारे मागितली जाते. २०२१-२२ पासून नाबार्डच्या सूचनांनुसार ‘डीबीटी’द्वारे संबंधित लाभार्थ्यांच्या पीक कर्जावरील होणारी व्याजाची रक्कम ही त्यांच्या बचत ठेव खात्यात देण्यात येणार आहे.

Crop Loan
Agriculture Crop Loan : शेतमाल तारणद्वारे १ कोटी १७ लाखांवर कर्ज वितरण

त्यामुळे हंगाम २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून पीककर्जाची मुद्दल व व्याज संस्थांद्वारे वसूल करण्यात आले आहे. मुदतीत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांद्वारे फक्त मुद्दल रकमेची वसुली करावी.

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा आगाऊ लाभ द्यावा. तसेच शेतकऱ्यांना पुढील पीककर्जासाठी पात्र ठरवावे. याबाबत प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना सूचित करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com