Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त मंडळे जाहीर, उपाययोजनांकडे दुर्लक्ष

Drought Condition : एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अजूनही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांकडून कर्जवसुली, थकीत बीजबिलांसाठी शेतीपंपांचे वीजेचे जोड तोडण्याचे प्रकार सुरू आहेत.
Farmer
FarmerAgrowon
Published on
Updated on

Nagar News : शासनाने यंदा सुरवातीला ४० तालुक्यात व नंतर १०२१ महसुल मंडलांत दुष्काळ जाहीर केला. या मंडलांत दुष्काळीस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे जाहीर केले.

मात्र एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अजूनही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे. शासन आणि प्रशासनात याबाबत समन्वयाचा अभाव आहे. शेतकऱ्यांकडून कर्जवसुली, थकीत बीजबिलांसाठी शेतीपंपांचे वीजेचे जोड तोडण्याचे प्रकार सुरू आहेत.

पुरेसा पाऊस नाही, खरिपाची पिके गेली, रब्बीत तर अनेक गावांत पेरणीच झाली नाही. यामुळे शेतकरी हतबल आहे. शासनाने राज्यात ३१ आक्टोबरला १५ जिल्ह्यांतील २४ तालुक्यांत तीव्र तर १६ तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर केला आहे.

त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी नव्याने अध्यादेश काढून २७ जिल्ह्यांतील २०२१ मंडले दुष्काळ सदृश म्हणून जाहीर केली. दुष्काळ आणि दुष्काळसदृष्ट असे असले तरी दोन्ही गावांत आठ प्रकारच्या सवलती मिळणार असल्याचे आणि त्या तातडीने लागू करणार असल्याचे जाहीर केले. मात्र उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झालेली नाही

अनेक गावांत दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. शेतकऱ्यांकडील कर्जवसुली थांबविणे, कर्जाचे पुनर्गठन करणे, कृषिपंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट व वीज न तोडणे या बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे. कर्जवसुली, विजेची तोडणी सुरुच असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Farmer
Drought Farmer Help : दुष्काळ, मॉन्सूनोत्तर पावसामुळे बाधितांना ५० हजारांची मदत द्या

जाहीर झालेल्या सवलती...
- जमीन महसुलात सूट,
- पीक कर्जाचे पुनर्गठन,
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषिपंपांच्या चालु बिलात ३३.५ टक्के सूट
- शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी
- ‘रोहयो’अंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता
- आवश्यक ठिकाणी पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकरचा वापर
- शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे

कोरडगावकडे दुर्लक्ष कायम
कोणत्याही धरणाचे पाणी शाश्वत नाही. बहुतांश भाग कोरडवाहू. यंदा तर पाऊसही कमी. त्यामुळे खरिपातील बहुतांश पिके वाया गेली. रब्बीत अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी पेरणी करता आली नाही. यापुढचे जुलैपर्यंतचे आठ महिने कसे काढायचे, याची चिंता आहे. असे असूनही नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील कोरडगाव (ता. पाथर्डी) मंडळाला दुष्काळातून वगळले. शासनाकडून अन्याय होत असल्याची भावना या भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

Farmer
Maharashtra Drought : केंद्रीय पथकाकडून बारामती तालुक्यात पाहणी
दुष्काळ जाहीर झालेल्या गावांत पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती व अन्य बॅंकाशी निगडित बाबींविषयी राज्य बॅंकिंग समिती (एसएलबीसी) त्या संदर्भात आदेश काढते. या समितीची नुकतीच बैठक झाली आहे. गावांची आणेवारी निश्चित झालेली नसल्याने आदेश काढले तरी अंमलबजावणीला उशीर लागेल.
आशिष नवले, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक.
नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक गावांत दुष्काळ आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांत उपाययोजना करणे गरजेचे आहे. बॅंकांकडून कर्जवसुली, जप्ती सुरुच आहे. विजेचे जोडही तोडण्याचे काम सुरु आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क सक्तीने वसुल केले जात आहे. दुष्काळ फक्त नावालाच जाहीर केला आहे.
अनिल औताडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.
खरीप आणि रब्बीची पिके गेली. सरकारने दुष्काळ जाहीर केला. परंतु खासगी बॅंकांकडून वसुली सुरुच आहे. बॅंका काही दिवसांची सवलतही देत नाहीत. दुष्काळी परिस्थिती, त्यात बॅंकांकडून होणारा त्रास यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
-नीलेश औताडे, शेतकरी, माळवाडी, ता. श्रीरामपूर, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com