Onion Crop Damage
Onion Crop Damage Agrowon

Onion Crop Damage : तणनाशक फवारणीमुळे कांदा पीक जळाले

Weedicide : कांदा रोपांचे नुकसान, मजूर टंचाई, भारनियमन, अशी आव्हाने पेलून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा कांदा लागवडी पूर्ण केल्या आहेत.
Published on

Nashik News : कांदा रोपांचे नुकसान, मजूर टंचाई, भारनियमन, अशी आव्हाने पेलून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा कांदा लागवडी पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी तणनाशकाच्या फवारणीमुळे नुकसान झाल्याचे देवळा व कळवण तालुक्यात पुढे आले होते; मात्र आता सटाणा, मालेगाव, सिन्नर व निफाड या तालुक्यांतही नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. जवळपास हे नुकसान ५०० हेक्टरपर्यंत असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे म्हणणे आहे.

कांदा पिकात तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी केली. मात्र देवळा तालुक्यातील मेशी परिसरात १०० हेक्टरवर नुकसान झाल्याचे समोर आले होते. तर दुसऱ्या टप्प्यात कळवण तालुक्यातील निवाणे परिसरात हे नुकसान २० एकरपर्यंत होते.

मेशी (ता. देवळा) येथे तक्रार निवारण समितीनंतर खुद्द कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाहणी केली. या वेळी डॉ. राहुल आहेर, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कांदा पिकाचे पूर्णतः १०० टक्के नुकसान झाल्याची स्थिती आहे.

Onion Crop Damage
Onion Crop Damage : बदलत्या वातावरणाचा खटाव तालुक्यात कांदा रोपांना फटका

कृषिमंत्र्यांनी हा नुकसानीचा प्रकार गांभीर्याने घेत तत्काळ तणनाशक उत्पादक कंपनीशी संपर्क साधला. तर नुकसानग्रस्त भागातील माती व कांद्याचे पूर्णपरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा संबंधित तणनाशक साठा ताब्यात घेऊन नमुने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवले आहेत.

Onion Crop Damage
Onion Crop Damage : शेतकऱ्याने कांद्यावर फिरविला रोटावेटर

याबाबत अंतिम अहवाल येणे बाकी असतानाच इतर तालुक्यांतील नुकसान पुढे आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषिमंत्र्यांच्या आदेशानुसार संबंधित तणनाशक व बॅच संबंधित साठा सील करण्यात आला आहे. तर पुढील तपासणी सुरू आहे.

उन्हाळ कांदा पिकावर तणनाशक फवारणीमुळे सुमारे ५०० हेक्टरवरील पिके जळून गेली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांचे पीक हातातून गेले आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तणनाशक फवारणीबाबत कोणतेही मार्गदर्शन केले जात नाही. तणनाशक उत्पादक कंपन्या व विक्रेते यांच्याकडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना प्रति एकरी दीड लाख रुपये भरपाई द्यावी.
- भारत दिघोळे, अध्यक्ष-कांदा उत्पादक शेतकरी संघटना
तणनाशक पिकांवर फवारले. पण काही दिवसांत संपूर्ण पीकच जळून गेले. साधारणतः एक एकरचे नुकसान झाले असून, माझे वर्षभराचे उत्पन्न बुडाले आहे.
- नीलेश आहिरे, शेतकरी, निवाणे, ता. कळवण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com