Kharif 2024 Pik Vima: शेतकऱ्यांसाठी दिलासा! खरीप पीक विम्याची २३०८ कोटी भरपाई मंगळवारपर्यंत खात्यात: कृषी विभाग

Agriculture Department: राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता दिल्याने खरीप 2024 पीक विमा भरपाईसाठी मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल २३०८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, मंगळवारपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे कृषी विभागाने जाहीर केले.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News: खरीप हंगाम २०२४ मधील पीक विमा भरपाई राज्य सरकारने हप्ता न दिल्यामुळे रखडली होती. राज्य सरकारने आता विमा कंपन्यांना आपला विमा हप्ता दिला. त्यामुळे खरीपातील विमा भरपाईचे २ हजार ३०८ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शेतकऱ्यांच्या खात्यात मंगळवारपर्यंत ही रक्कम जमा होईल, असे कृषी विभागाने सांगितले. 

खरीप २०२४ हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या ४ ट्रिगर अंतरर्गत भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना एकूण २ हजार ३०८ कोटी रुपये भरपाई निश्चित झाली आहे. मात्र राज्य सरकारने आपला हप्ता दिला नसल्यामुळे ही भरपाई रखडली होती. 

Agriculture Department
Crop Insurance 2023: खरिप २०२३ मधील १८१ कोटींची रखडलेली विमा भरपाई मिळणार

वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना खरीप २०२४ मध्ये यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीतून १ हजार ४५५ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे जवळपास ३२ लाख शेतकऱ्यांना ही भरपाई मंजूर झाली आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०६ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली.

Agriculture Department
Crop Insurance 2022 : खरिप आणि रब्बी २०२२-२३ ची विमा भरपाई आता मिळणार

तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून १ लाख ४८ लाख शेतकऱ्यांना १४१ कोटी भरपाई मंजूर झाले आहेत. पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई १ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही भरपाई १३ कोटींच्या दरम्यान आहे. यापैकी काही रक्कम यापुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. तर जवळपास ५४ लाख शेतकऱ्यांची भरपाई रखडली होती. ही भरपाई एकूण २ हजार ३०८ कोटी रुपये होती. 

राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हिस्सा आणि आपला विमा हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांना खरीपातील २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याला सुरुवात होईल आणि मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल, असे कृषी विभागाने सांगितले. 

खरीपातील निश्चित झालेली भरपाईची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पूर्वसूनचना आलेल्या नाहीत. मागील आठवड्यापासून काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्याच्या काही नुकसानीच्या सूचना आलेल्या आहेत. पण चालू रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाले नाही, त्यामुळे रब्बीत मोठी भरपाई मिळणार नाही, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com