Farm Road : शेकडो शेतकऱ्यांची पाणंद वाट मोकळी

Pananad Road : मौजा सार्शी व धानोरा येथील पाणंद रस्ता अडविण्यात आला होता. हा रस्ता मोकळा करून देण्याबाबत या भागातील शेतकऱ्यांनी तिवसा तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती.
Farm Road
Farm RoadAgrowon
Published on
Updated on

Amaravti News : मौजा सार्शी व धानोरा येथील पाणंद रस्ता अडविण्यात आला होता. हा रस्ता मोकळा करून देण्याबाबत या भागातील शेतकऱ्यांनी तिवसा तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती.

याच अनुषंगाने तहसीलदार डॉ. मयूर कळसे, महसूल नायब तहसीलदार आशिष नागरे यांनी घटनास्थळाची पाहणी व अर्जदार व गैरअर्जदार यांची मध्यस्ती करून पाणंद रस्ता मोकळा करून दिला.

Farm Road
Farm Road Campaign : शंभर दिवसांच्या कार्यक्रमात शेतरस्ता मोहीम

पाणंद रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून शेतातील मालाची वाहतूक सुकर झाली आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या हेतुपुरस्सर अडवणुकीमुळे रस्त्याची कामे रखडली होती, असे सांगण्यात येते.

शासनाच्या निर्देशानुसार पाणंद रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत तिवसा महसूल विभाग युद्धपातळीवर काम करीत असतानाच मौजा सार्शी ते धानोरा हा पाणंद रस्ता दोन शेतकऱ्यांनी अडवून ठेवल्याची तक्रार येथील शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयात केली होती.

Farm Road
Farm Road Development: शेतरस्ता हाच शेतकऱ्याच्या प्रगतीचा मार्ग

पाणंद वहिवाट अडविल्याने या भागातील शेतकऱ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेत तिवसा तहसीलदार डॉ. मयूर कळसे व नायब तहसीलदार आशिष नागरे यांनी बांधावर जाऊन पाहणी केली व अनेक वर्षापासून अडवणूक केलेला पाणंद रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला आहे.

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत तिवसा महसूल विभागाचे आभार मानले. या प्रसंगी मंडळ अधिकारी दिलीप इंगळे, तलाठी वैभव देशमुख, रुपाली कुसरे, तेजस्विनी केवदे, महसूल सहायक राहुल निस्वादे, तेजस सांगळुदकर, कोतवाल बाळू घुरडे, वाहनचालक किशोर राठोड, तिवसा भूमी अभिलेखचे श्री. ढोके, माहुलीचे पोलिस कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com