Farm Road Campaign : शंभर दिवसांच्या कार्यक्रमात शेतरस्ता मोहीम

Farm Road : प्रशासनातील प्रलंबित कामांना वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा सातकलमी कृती कार्यक्रम जाहिर केला आहे.
Farm Road
Farm RoadAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा

Latur News : लातूर : प्रशासनातील प्रलंबित कामांना वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा सातकलमी कृती कार्यक्रम जाहिर केला आहे. यात जिल्हा प्रशासनानेही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याला शेतरस्त्याचा विषय कार्यक्रमात घेतला असून फेब्रुवारीअखेर विविध शेतरस्त्यावरील अतिक्रमण दूर करून ते मोकळे करून देण्यासह शेतकऱ्यांनी मागणी केल्यानुसार मंजूर रस्ते तयार करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला असून त्यानुसार रस्त्याची निवड करणे, मोजणी करणे व रस्ता मोकळा करून देण्यासाठी विविध विभागावर जबाबदारी निश्चित केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Farm Road
Farm Road issue : पाऊलवाट मोकळी होताच साडेआठ फुटी शेतरस्ता

शंभर दिवसाच्या कार्यक्रमानुसार गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते पाणंद पांचण शेतरस्ते शिवाररस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे, तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १४३ आणि मामलेदार न्यायालय अधिनियमाच्या कलम पाच नुसार अंतर्गत मजूर वहिवाटीचे रस्ते मोकळे करून तयार करण्यात येणार आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतजमिनीचे तुकडे होत असून शेतीचे क्षेत्र कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल त्यांच्या शेतातून सुरू असलेली वहिवाट व पूर्वीचा शेतरस्ता बंद करण्याकडे आहे.

यामुळे मोठ्या संख्यने वहिवाट रस्ते, ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, शिवरस्ते व पाणंदरस्त्यावर शेजारच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करत रस्ते वहितीखाली आणले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी मोठ्या संख्येने शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून त्यांचे मजबुतीकरण केले. महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानात या उपक्रमाचा समावेश झाला. यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्याची मोहीम नियमित सुरू असते. मात्र, अपेक्षित प्रमाणात हे काम होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात. यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमात जिल्हाधिकारी ठाकूर यांनी शेतरस्ता अभियानाला चालना देत कालबद्ध कार्यक्रमाची आखणी केली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांना शेतरस्ते मोकळे करून शेतकऱ्यांच्या सहभागाने ते तयार करून द्यावे लागणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

महिनाभराचा कालबद्ध कार्यक्रम

ग्रामीण भागातील ग्रामीण गाडी मार्ग साडेसोळा ते एकवीस फूट तर पाऊलवाड ही नकाशात तुटक रेषेने दाखवल्यामुळे सव्वाआठ फूट रुंदीची आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात गाडी मार्ग व पाऊलवाट्याच्या नोंदी असलेले नकाशे संकलित करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात बंद तसेच अतिक्रमित रस्ते व पाऊलवाटेची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर रस्ते मोकळे करण्यासाठी सरपंच व शेतकऱ्यांची बैठक घेऊन समन्वयाने व सर्वसहमतीने रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. वादग्रस्त रस्त्यासाठी सहमतीने रस्ता खुला करण्यासाठी व त्यासंदर्भातील दावे निकाली काढण्यासाठी लोकअदालतीचा आधार घेण्यात येणार आहे. सर्व प्रयत्नातून रस्ता मोकळा होत नसल्यास भूमिअभिलेख व पोलीसांच्या साह्याने तो मोकळा करून रस्ता तयार करण्यात येणार आहे. यानुसार जिल्ह्यात फेब्रुवारीअखेर मोठ्या संख्येने रस्ते मोकळे होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com