Sangli Heavy Rain : पलूस, वाळवा तालुक्यांत मुसळधार पावसाने दाणादाण

Unseasonal Rain : द्राक्षबागांमध्ये व ऊस शेतीत पाणी साचले आहे. पावसाने दिलासा मिळाला असला, तरी द्राक्षबागांना मोठा फटका बसणार आहे. पलूस तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Sangli News : पलूससह वाळवा तालुक्याच्या काही भागांत शुक्रवारी (ता. २३) रात्रीपासून आज सायंकाळपर्यंत जोरदार वादळी पाऊस पडला. या पावसामुळे ओढे, नाल्यांना पाणी आले आहे. द्राक्षबागांमध्ये व ऊस शेतीत पाणी साचले आहे. पावसाने दिलासा मिळाला असला, तरी द्राक्षबागांना मोठा फटका बसणार आहे.

पलूस तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. यंदा कडक उन्हाळा असल्याने विहिरी, कूपनलिका, तलावांमधील पाण्याने तळ गाठला. पिकांना पाणीटंचाई भासू लागली. अखेर तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावली आणि चित्रच बदलून टाकले. तालुक्यात जोरदार वारा आणि पावसाने हजेरी लावली.

Heavy Rain
Unseasonal Rain Damage: अमरावतीत अवकाळी पावसामुळे ५१८ हेक्टर पिकांचे नुकसान

त्यामुळे शेतीला दिलासा मिळाला. एका बाजूला पाणीटंचाई दूर झाली, म्हणून शेतकरी आनंदीत असतानाच गेल्या चार दिवसांत इतका पाऊस पडला की, शेतात पाणी साचू लागले. काल रात्रीपासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. आजही दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. ओढे-नाल्यांना पाणी आले, द्राक्षबागा, ऊस व अन्य पिकांमध्ये पाणी साचले.

त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. वादळी पावसाने विशेषकरून द्राक्षबागांना मोठा फटका बसत आहे. एप्रिलमध्ये बहुतांश द्राक्षबागांची खरड छाटणी झाली. कोवळ्या काड्या सध्या द्राक्षवेलीवर आहेत. मात्र, वारा व पावसाने काड्या मोडत आहेत, पाने तुटत आहेत. तसेच अतिपावसाने व काडीला सूर्यप्रकाश मिळत नसल्याने काडी परिपक्व होण्यामध्ये अडचणी येणार आहेत.

Heavy Rain
Unseasonal Rain : सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान; पिकांचे तत्काळ पंचनामे करा

दुधोंडी परिसरात पाऊस

दुधोंडी ः परिसरात शनिवारी पाचव्या दिवशीही सलग मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली, परिसरातील शेतशिवारे पाण्याने भरून गेली आहेत. आता खरीप हंगामातील मशागती होतील की नाही, याची काळजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. शनिवारी तर पहाटेपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. दुसरीकडे शिवारे पाण्याने भरून गेली आहेत.

गेल्या आठवडाभरापूर्वी एकही उन्हाळी पाऊस नसल्याने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले होते. एखादा वळवाचा पाऊस पडला की शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागणार होते. मात्र गेल्या पाच दिवसापासून सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे परिसरातील शिवारे पाण्याने भरून गेली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com