Tuti Cultivation : नांदेडमध्ये ११२० एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी

Mulberry Cultivation : महारेशीम अभियानांतर्गत जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील एक हजार १११ शेतकऱ्यांनी एक हजार १२० एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे.
Mulberry Cultivation
Mulberry CultivationAgrowon

Nanded News : महारेशीम अभियानांतर्गत जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील एक हजार १११ शेतकऱ्यांनी एक हजार १२० एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. यात सिल्क समग्र दोन मधून ६४१ शेतकऱ्यांनी ६५० एकरसाठी नोंदणी केली आहे. तर मनरेगामधून ४७० शेतकऱ्यांनी ४७० एकरवर नोंदणी केलेल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास कार्यालयाकडून मिळाली.

जिल्ह्यात मागील काही वर्षापासून तुतीची लागवड केली जाते. शेतीपूरक रेशीम कोष उत्पादन असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल याकडे वाढला आहे. दरम्यान शासनानेही तुती लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महारेशीम अभियानाच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेची जोड दिल्याने शेतकऱ्यांना या शेतीमधून रोजगारही मिळत आहे.

यात मागील वर्षापासून केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र दोन या योजनेतूनही शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी आवाहन करण्यात आले होते. यंदा जिल्ह्यात महारेशीम अभियान राबवून शेतकऱ्यांना तुती लागवडी संदर्भात जनजागृती करण्यात आली. जिल्ह्याला एक हजार एकरवर नोंदणी करण्याचे उदिष्ट्ये देण्यात आले होते.

Mulberry Cultivation
Tuti Lagwad : पश्चिम विदर्भात ५०० एकरांवर होणार नवीन तुती लागवड

यात जिल्हा परिषदेला चारशे एकर, कृषी विभाग तीनशे एकर व रेशीम विकास अधिकारी कार्यालयाला तीनशे एकरचे लक्षांक देण्यात आला होता. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना एक डिसेंबर ते ३० डिसेंबरचा कालावधी देण्यात आला होता.

या कालावधीत कृषी विभाग व जिल्हा परिषदेकडे मात्र एकाही शेतकऱ्यांची नोंद झाली नाही. तर रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडे मात्र शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत एक हजार १११ शेतकऱ्यांनी एक हजार १२० एकरसाठी नोंदणी केली आहे.

Mulberry Cultivation
Tuti Cultivation : तुती लागवडीचे अधिकार आता कृषी अधिकाऱ्यांनाही

एका क्षेत्र सहायकावर रेशीमचा कारभार

जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात तुतीची लागवड केली जाते. रेशीम संचालनालयाकडून दरवर्षी वाढीव लक्षांक देण्यात येते. परंतु नांदेडला संपूर्ण १६ तालुक्यासाठी केवळ एक क्षेत्र सहायक कार्यरत आहे.

एका क्षेत्र सहायकाला जिल्ह्यातील रेशीमचा कारभार पाहावा, लागत आहे. जिल्हा परिषदेच्या रोहयो शाखेतून दोन तांत्रिक सहायक रेशीमकडे डेपोटेशनवर आहेत. जिल्हा कार्यालयातील दोन क्षेत्र सहायक व एक वरिष्ठ तांत्रिक सहायक असे तीन पदे रिक्त आहेत, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com