Tuti Lagwad : पश्चिम विदर्भात ५०० एकरांवर होणार नवीन तुती लागवड

Indian Agriculture : पारंपरिक पिकांऐवजी आता इतर पिकांकडेही शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे रेशीम विभागानेही प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या हंगामात अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत प्रत्येकी २०० आणि वाशीम जिल्ह्यात १०० एकरांवर तुती लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
Tuti Lagwad
Tuti LagwadAgrowon

Akola News : पारंपरिक पिकांऐवजी आता इतर पिकांकडेही शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे रेशीम विभागानेही प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या हंगामात अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत प्रत्येकी २०० आणि वाशीम जिल्ह्यात १०० एकरांवर तुती लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात रोपांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झालेली आहे.

या हंगामात प्रादेशिक विभागाने नवीन तुती लागवडीसाठी ९०० एकरांचा लक्षांक मिळाला आहे. त्या अनुषंगाने महारेशीम अभियान गेल्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ मध्ये राबविण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. हा लक्षांक पूर्ण झाला. नवीन तुती लागवडीसाठी तुती लागवड पूर्व प्रशिक्षण तथा प्रात्यक्षिक आता आयोजित करण्यात येत आहेत.

९०० एकर लागवड करण्यासाठी एकरी सहा हजारप्रमाणे ५४ लाख रोपे लागणार आहेत. विशेष म्हणजे शेतकरी स्तरावर अकोला जिल्ह्यात अंदाजे ३५ लाख तुती रोपे उपलब्ध आहेत. तसेच इतर जिल्ह्यातही व्यावसायिक शेतकरी स्तरावर रोपे तयार करण्यात आली आहेत.

काही शेतकऱ्यांनी स्वतः फेब्रुवारी महिन्यात रोपवाटिका तयार केल्या आहेत. अमरावती प्रादेशिक विभागासाठी यंदा ९.५० लाख अंडीपुंज वाटपाचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यापासून ५७५ टन कोष उत्पादनाची अपेक्षा आहे.

Tuti Lagwad
Tuti Lagwad: परभणी जिल्ह्यात नवीन तुतीची ११३ एकरांवर लागवड

नुकतेच एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये रेशीम विस्तार, प्रशिक्षण, प्रचार प्रसिद्धीसाठी आणि रेशीम धागा निर्मितीसाठी अनेक योजना शासनाने जाहीर केल्या.

वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी यथायोग्य होण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, वस्त्रोद्योग प्रधान सचिव, अवर सचिव, उपसचिव आणि वस्त्रोद्योग आयुक्त प्रदीप चंद्रन, उपसंचालक महेंद्र ढवळे हे महसूल विभागवार बैठका घेऊन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सहायक संचालक सु. प्र. फडके यांनी दिली.

...असे मिळते अनुदान

शेतकऱ्यांसाठी मनरेगाअंतर्गत रेशीम शेतीकरिता एकरी तीन लाख ५८ हजार ११५ रुपये तीन वर्षांसाठी मजुरी व साहित्यासाठी देण्यात येतात. तसेच सिल्क समग्र-२ या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत एक एकर तुती लागवडीसाठी ४५ हजार, ठिबक सिंचनासाठी प्रती एकरी ४५ हजार, कीटक संगोपन गृहासाठी २ लाख ४३ हजार, संगोपन साहित्यासाठी ३७ हजार ५००, निर्जंतुकीकरण साहित्यासाठी ३ हजार ७५० देण्यात येतात. अनुसूचितजाती व अनुसूचित जमातीसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

सध्या असलेली तुती लागवड

अकोला - ४३३, बुलडाणा - २५९, वाशीम - ६४, अमरावती - २११, यवतमाळ - ४८२, एकूण - १४४९

नवीन लागवड

अकोला - २००, बुलडाणा - २००, वाशीम - १००, अमरावती - २००, यवतमाळ - २००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com