
Nanded News : रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील साखर कारखान्यातील वाहनचालकांसोबत रस्ता सुरक्षेवर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वतः वाहनचालकांना मार्गदर्शन करत रिफ्लेक्टर व रेडियम टेपच्या वापराचे महत्त्व समजाऊन सांगितले.
जिल्ह्यात सध्या ऊसतोडणीची मोहीम सुरू असून ऊस वाहतूक करणाऱ्या हजारो ट्रॅक्टर-ट्रॉल्या गावागावातून रस्त्यांवरून प्रवास करत आहेत. रात्रीच्या वेळी अपघाताचे प्रमाण वाढू नये, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने साखर कारखान्यांशी समन्वय साधून वाहनचालकांना रिफ्लेक्टर वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांनी लोहा येथील साखर कारखान्याच्या वाहनचालकांना भेटून रस्ता सुरक्षेच्या नियमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टिव्ह रेडियम टेप व रिफ्लेक्टर कापड लावल्यास रात्रीच्या वेळी वाहनांच्या दृश्यतेत वाढ होऊन अपघात टाळता येतात.
प्रादेशिक परिवहन अधिकारी विनयकुमार अहिरे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांच्या नेतृत्वाखाली विविध साखर कारखान्यांमध्ये वाहनचालकांसोबत रस्ता सुरक्षेसंदर्भात चर्चा झाली.
अहिरे यांनी दुचाकी, सायकली व बैलबंड्यांसाठीही रिफ्लेक्टर वापरण्याचे आवाहन केले. अल्प किमतीच्या या उपायांमुळे रात्रीच्या वेळी मोठी सुरक्षा मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी रस्त्यांवर लावलेल्या रिफ्लेक्टर बोर्डांची सुरक्षा राखण्याचे आवाहनही करण्यात आले.
वाहनचालकांत जनजागृतीचे प्रयत्न
रस्ता सुरक्षेच्या प्राथमिक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील वाहनचालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू असून, सुरक्षित वाहतुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.