Forest Conservation : वन विभागाकडून १२० कुटुंबांना गॅस जोडणी

Forest Department : ज्वलनासाठी लागणाऱ्या लाकडांसाठीचे वनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी १२० कुटुंबांना गॅस जोडणी दिल्याने वनांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी केले.
forest Department
forest DepartmentAgrowon

Pune News : ‘‘लोकसहभागातून वनसंवर्धन ही आता काळाची गरज झाली आहे. वन वणवा नियंत्रण, झाडे लावणे तसेच झाडे तोड टाळणे, शिकार आदी वनगुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वन संरक्षण समिती ही अत्यंत चांगली समन्वयाची भूमिका पार पाडीत आहे. या वन संरक्षण समितीअंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबवून वनक्षेत्राचे संरक्षण व संवर्धन केले जाते आहे.

ज्वलनासाठी लागणाऱ्या लाकडांसाठीचे वनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी १२० कुटुंबांना गॅस जोडणी दिल्याने वनांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी केले.

भरे (ता.मुळशी) येथील वनपरिक्षेत्राच्या वतीने तसेच मुठा खोऱ्यातील वनसंरक्षण समितीच्या माध्यमातून १२० कुटुंबांना गॅसजोड वितरणानिमित्त खारावडे (ता.मुळशी) येथील कार्यक्रमात चव्हाण बोलत होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

forest Department
Forest Department : कातळशिल्प संशोधनासाठी वन विभागाकडून मदत

वैयक्तिक लाभ योजनेअंतर्गत खारावडे मधील ६० लाभार्थी व आंदगावमधील ६० लाभार्थी असे एकूण १२० लाभार्थ्यांना नवीन एलपीजी गॅस जोडणीचे वाटप संतोष चव्हाण व वनसंरक्षण समिती अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.

forest Department
Forest Department : वनकर्मचाऱ्यांनी सुरक्षित साधनांचा वापर करावा ः डुंबरे

कार्यक्रमाला खारावडे येथील वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच शंकरराव मारणे, आंदगावच्या वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष अनिल आटाळे, सरपंच प्रफुल्ल मारणे, वनपाल नंदकुमार शेलार, वनरक्षक भरत सावंत, गणेश धूळशेट्टी, कांचन ढोमसे, खारावडे देवस्थानचे विश्वस्त अनिल सोनवणे, माउली साळेकर, तेजस जोगावडे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शेडगे, शिवाजी मारणे, वसंत ननावरे, पोलिस पाटील प्रवीण शेडगे, माउली गायकवाड या वेळी आदी उपस्थित होते.

या वेळी नंदकुमार शेलार म्हणाले, ‘‘स्थानिक भागातील वनक्षेत्रावरील लाकडाचा भार कमी करण्यासाठी पर्याय उपलब्ध करण्याच्या हेतूने वनविभागाचा हा उपक्रम राबविला जात आहे. वन वणवा लागल्यास प्रथम स्थानिकांना समजते. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ही वनसमिती व स्थानिक नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे ठरते.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com