घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागले

मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यातच या महिन्यात गॅसच्या किंमतीत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे.
Domestic Gas Price
Domestic Gas PriceAgrowon
Published on
Updated on

नवी दिल्ली : एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले असताना इंधन, गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ सुरुच आहे. आज (दिनांक १९ मे) एलपीजी गॅसच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ३.५० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यासोबतच देशात एलपीजी सिलिंडरची किंमत १००५ रुपयांच्या जवळ पोहोचली आहे.

मे महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. बारा दिवसांपूर्वी ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. गुरुवारी त्यात पुन्हा ३ रुपये ५० पैशांची भर पडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य आधीच होरपळत असताना या दरवाढीमुळे त्यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

Domestic Gas Price
महागाई रोखण्यात आरबीआयला अपयश!

मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यातच या महिन्यात गॅसच्या किंमतीत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना झळा सोसाव्या लागत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात घरगुती सिलेंडरच्या दरवाढीने तर त्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी आता २३५४ रुपये मोजावे लागणार आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसाठी नवीन दर अनुक्रमे २४५४ रुपये, २३०६ रुपये आणि २५०७ रुपये आहेत. हातगाडी, ठेला, लहान हॉटेल, अशा किरकोळ व्यावसायिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com