Loan Recovery Issues : ‘बहिणीं’च्या पैशातून बँकांची वसुली

Loan Repayment : हजारो महिलांच्या खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत. मात्र हीच संधी साधून काही बॅंकांकडून महिलांकडे असलेल्या इतर कर्जांचे हप्ते परस्पर वसूल करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.
Loan Recovery
Loan RecoveryAgrowon
Published on
Updated on

Amravati News : राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची धूम सुरू असून, रक्षाबंधनाच्या पर्वावर हजारो महिलांच्या खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत. मात्र हीच संधी साधून काही बॅंकांकडून महिलांकडे असलेल्या इतर कर्जांचे हप्ते परस्पर वसूल करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये संताप व्यक्त होत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना थेट इशारा दिला आहे. लाडकी बहीण खात्यावरील पैसे वळते केल्यास बॅंकेविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशाराच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिला आहे.

Loan Recovery
Ladki Bahin Yojana : बहिणींना लखपती झाल्याचे पाहायचे आहे : मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाखांवर महिलांचे अर्ज आले. त्यापैकी बहुतांश महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम वळती झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र काही बॅंका महिलांकडे असलेल्या इतर कर्जांची वसुली या रकमेतून करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Loan Recovery
CM Majhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी ६ लाखांवर अर्ज
काही बॅंका महिलांच्या खात्यातून कर्जकपात करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या योजनेतून कुठलीही कपात करू नये, अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बॅंकेविरुद्ध कारवाई केली जाईल. तसेच ज्या लाभार्थ्यांना अद्यापही या योजनेचा निधी मिळालेला नाही, त्यांनी आपले खाते आधार लिंक करून घ्यावेत. त्यामुळे लवकरात लवकर हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. ज्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही, त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी.
सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती
अमरावती जिल्ह्यात या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तीन लाखांवर महिलांच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे टाकण्यात आलेले आहे. काही महिलांची आधार लिंकची अडचण आहे. त्यांनी ती तातडीने दूर करावी. तसेच जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com