Heavy Rain : अतिवृष्टीचा चुकून गेलेला २२ लाखांचा निधी वसूल

Fund Update : जामोद उपविभागात झालेल्या अतिवृष्टी, महापुराने शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. यात कोट्यवधीचे नुकसान झाले. त्याची भरपाई म्हणून शासनाने केलेली मदत काही अपात्र लाभार्थ्यांना मिळाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत २२ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : गेल्या वर्षी २२ जुलै रोजी जळगाव जामोद उपविभागात झालेल्या अतिवृष्टी, महापुराने शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. यात कोट्यवधीचे नुकसान झाले. त्याची भरपाई म्हणून शासनाने केलेली मदत काही अपात्र लाभार्थ्यांना मिळाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत २२ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यात काही मध्यस्थांनी महत्त्वाची भूमिका वठविल्याचे बोलले जात आहे.

तलाठी, प्रशासनातील कर्मचारी व गावस्तरावरील मध्यस्थांनी मिळून हे कुभांड रचल्याचा आरोप होत आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे जळगाव जामोद तालुक्यात जमीन खरडून गेली. या नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक मदत दिली. यापैकी काही मदत ही शेती खरडलेली नसलेल्या, कुठलेही नुकसान झालेले नसतानाही मिळाल्याचे समोर आले. या प्रकाराने महसूल यंत्रणा हादरून गेली आहे. तहसीलदारांनी तातडीने या प्रकरणी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यांना बँकेत होल्ड लावण्याचे निर्देश देत शासकीय पैसा परत भरण्याबाबत नोटिसा बजावल्या.

Rain Update
Heavy Rain : गेल्या बावीस दिवसांत ५७ मंडलांत अतिवृष्टी

अनेकांनी हा अचानक झालेला ‘धनलाभ’ तत्काळ खात्यातून काढत मार्गी लावलेला आहे. कुठलेही नुकसान नसल्याने खोटी कागदपत्रे जोडण्यात आली की काय, असा संशय आहे. कागदपत्रे, याद्या अपलोड करण्याचे काम शासकीय यंत्रणेच्या सहकार्याशिवाय झालेले नाही. दरम्यान गुरुवारी (ता.२५) काही लाभार्थ्यांनी तहसीलदार शीतल सोलाट यांची भेट घेत बाजू मांडली.

Rain Update
Pune Rain : संततधारेने दौंड तालुक्यात ४०० गुऱ्हाळघरे बंद

ऑडिओ क्लिप व्हायरल

या प्रकरणात आता एक तलाठी व मध्यस्थाच्या संभाषणाची ‘ऑडियो क्लिप’ व्हायरल झाली आहे. त्यात ते दोघेही आपण कसे दोषी नाही. कोण कोण यात सहभागी होते, याची सारवासारव करीत असल्याचे दिसून येत आहे. असे असताना आता महसूल यंत्रणा कुणाविरुद्ध कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत या प्रकरणात २२ लाख रुपये संबंधितांनी शासनाकडे परत केले आहेत. काही प्रकरणात सातबारा दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने असल्याने खातेबदल केल्याचा खुलासा काहींनी केला आहे. चुकीने गेलेल्या रकमेची वसुली करण्याचे काम सध्या केले जात आहे. त्यानंतर दोषींविरुद्धही निश्‍चितच कारवाई केली जाईल.
शीतल सोलाट, तहसीलदार, जळगाव जामोद, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com