Nashik Apmc Election Update : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी विक्रमी २४२० अर्ज

संपूर्ण जिल्हाभरात सोसायटी गटात एक हजार ४६१, ग्रामपंचायत गटात ६७८,व्यापारी गटात १८३, हमाल मापारी गटातील ९८ अर्जांचा समावेश आहे.
Nashik APMC Election
Nashik APMC ElectionAgrowon

Nashik Election Update : नाशिक जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची (Agriculture Produce Market Committee) निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून वातावरण तापले आहे. गटातटांच्या शर्यतीत दिग्गज उमेदवारांसह नवख्या चेहऱ्यांनीही या वेळी अर्ज भरून रंगत वाढवली आहे.

निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी सोमवारी (ता. ३) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी गर्दी केली होती. १४ बाजार समित्यांसाठीच्या २५२ जागांसाठी विक्रमी २ हजार ४२० अर्ज प्राप्त झाले आहेत.

संपूर्ण जिल्हाभरात सोसायटी गटात एक हजार ४६१, ग्रामपंचायत गटात ६७८,व्यापारी गटात १८३, हमाल मापारी गटातील ९८ अर्जांचा समावेश आहे. जिल्ह्यात होत असल्याने निवडणुकांसाठी गट एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत.

तर काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्याचा प्रस्तावही समोर आला होता. त्यापैकी सुरगाणा बाजार समितीत सोसायटी गटातील चार ग्रामपंचायत गटातील एक, तर व्यापारी गटातील दोन जागा बिनविरोध झाल्या.

Nashik APMC Election
Sangli Apmc Election : सांगली बाजार समितीसाठी शेवटच्या दिवशी ४१३ अर्ज

प्राप्त अर्जांची बुधवारी (ता. ५) छाननी होणार असून, गुरुवारी (ता. ६) उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, सर्वच बाजार समित्यांमध्ये दिग्गजांनी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारीसाठी कोणती चेहरे अंतिम होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या बाजार समित्यांची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. त्यांनतर सोमवारी (ता. ३) अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता.

त्यामुळे बाजार समितीत इच्छुकांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सर्वाधिक ३०९ अर्ज दाखल झाल्याने उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

प्रामुख्याने सर्वच बाजार समित्यांमध्ये दोन्ही गटांतील इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. यात प्रामुख्याने पिंपळगाव बाजार समितीत आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, गोकुळ गिते, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार, दीपक शिरसाट, प्रणव पवार, दीपक बोरसे, भास्कराव बनकर, राजेश पाटील, संदीप गडाख, किरण निरभवणे, नाशिक महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, नाशिक बाजार समितीत माजी खासदार देवीदास पिंगळे उपस्थित होते.

शिवाजी चुंभळे, कल्पना चुंभळे, नितीन देवीदास पिंगळे, दिलीप थेटे, छाया नामदेव हलकंदर, प्रल्हाद काकड, निवृत्ती अरिंगळे, सुरेश गंगापुत्र, भाऊसाहेब खांडबहाले, लासलगाव बाजार समितीत जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील, पंढरीनाथ थोरे, सुवर्णा जगताप, राजेंद्र डोखळे, चांदवड बाजार समितीत विद्यमान सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेचे संचालक सयाजीराव गायकवाड, सुकदेव जाधव उपस्थित होते.

Nashik APMC Election
Marathwada Apmc Election Update : मराठवाड्यात बाजार समिती निवडणूक अर्ज छाननीनंतरच चित्र स्पष्ट होणार

संजय जाधव, कारभारी आहेर, दिंडोरी. बाजार समितीत माजी सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतबाबा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, भाऊलाल तांबडे, विलास कड, देवळा बाजार समितीत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या धनश्री आहेर, माजी सभापती योगेश आहेर, घोटी बाजार समितीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा फेडरेशनचे संचालक ज्ञानेश्वर लहाने, तर मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांचे समर्थक व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अद्वय हिरे आदींचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com