Marathwada Apmc Election Update : मराठवाड्यात बाजार समिती निवडणूक अर्ज छाननीनंतरच चित्र स्पष्ट होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी निवडणूक होते आहे. या बाजार समित्यांसाठी विविध मतदार संघाकरिता एकूण १३५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
Beed Apmc Election
Beed Apmc ElectionAgrowon

Chhatrapati Sambhajinagar Election News : मराठवाड्यातील निवडणूक होऊ घातलेल्या बाजार समित्यांमधील (Market Committee) विविध प्रवर्गातील जागांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी (ता. ३) संपली आता छाननी आणि अर्ज माघारी नंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारीचे आणि गटांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मुदत संपलेल्या आणि प्रशासक नियुक्त असलेल्या बाजार समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया होते आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीनही जिल्ह्यांतील २१ बाजार समित्यांसाठी ही निवडणूक होते आहे.

त्यामध्ये बीडमधील ९, छत्रपती संभाजीनगरमधील ७ व जालना जिल्ह्यातील ५ बाजार समितीचा समावेश आहे. सहकारी संस्था मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी-अडते मतदारसंघ व हमाल-मापाडी मतदारसंघातून आपले प्रतिनिधी निवडून द्यावयाचे आहेत.

Beed Apmc Election
APMC Election : पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी मोठी चुरस

दाखल अर्जांच्या स्थितीनुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ७ बाजार समिती मधील विविध जागांसाठी सर्वाधिक १,३५० तर सर्वात कमी जालना जिल्ह्यातील ५ बाजार समित्यांमधील एकूण जागांसाठी ५३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांसाठी ११३५ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती बाजार समित्यांसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. अर्ज दाखल झाल्याच्या प्रक्रियेनंतर गटतटाच राजकारण जुळवण्याचे सूत्र हलविले जात आहेत.

महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेतून लोकसभा, विधानसभेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्रितपणे लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वांच्या गणितावर लढविण्या जाणाऱ्या बाजार समित्या निवडणुकीतील राजकारणावर त्याचा परिणाम किती होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बीड जिल्ह्यात एकूण ११३५ उमेदवारी अर्ज

जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांसाठी निवडणूक होते आहे. या सर्व बाजार समितीच्या विविध मतदार संघासाठी एकूण ११३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

त्यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघातून ६७९, ग्रामपंचायत मतदार संघातून २९४, व्यापारी-अडते मतदारसंघातून ८३ तर हमाल मापाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या ७९ अर्जांचा समावेश आहे.

त्यामध्ये मुदती अखेर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जमध्ये पाटोदा बाजार समितीसाठी १६३, वडवणी ९३, अंबाजोगाई १०६, कडा ५८, बीड १६६, केज १६०, माजलगाव १७२, गेवराई ६४ तर परळी बाजार समितीसाठी १२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

जालना जिल्ह्यात ५३८ उमेदवारी अर्ज

जालना जिल्ह्यातील एकूण पाच बाजार समितीसाठी निवडणूक होते आहे. या पाचही बाजार समित्यांमधील विविध मतदार संघातील एकूण जागांसाठी ५३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघातील ३०९, ग्रामपंचायत मतदार संघातील १४७, व्यापारी अडते मतदार संघातील ५० व हमाल मापाडी मतदारसंघातील ३२ उमेदवारी अर्ज यांचा समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यात १०६२ उमेदवारी अर्ज

धाराशिव जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांसाठी निवडणूक होते आहे. अर्ज दाखल करण्याच्या मुदती अखेर परांडा बाजार समिती मधून १५८, कळंब १८२, मुरूम ६६, धाराशिव १७४, तुळजापूर १६१, भूम १२३, वाशी ९२ व उमरगा बाजार समिती मधून १०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

विविध बाजार समित्यांमधील सहकारी संस्था मतदारसंघातून ६३४, ग्रामपंचायत मतदार संघातून २९५, व्यापारी अडते मतदारसंघातून ९४ तर हमाल मापाडी मतदारसंघातून ३९ मिळून एकूण १०६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

लातूर जिल्ह्यात १२४८ उमेदवारी अर्ज

लातूर जिल्ह्यातील दहा बाजार समितीसाठी निवडणूक होते आहे सर्व बाजार समित्या मिळून एकूण १२४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामध्ये लातूर बाजार समितीमधील १७०, औसा १६४, उदगीर २०४, चाकूर ११७, औराद शहाजानी ११९, निलंगा ११२, देवणी ८५, जळकोट ७०, अहमदपूर १०० तर रेणापूर बाजार समितीमधून दाखल झालेल्या १०७ उमेदवारी अर्जाचा समावेश आहे.

१० बाजार समित्या मिळून सहकारी संस्था मतदारसंघातून ७२७, ग्रामपंचायत मतदार संघातून ३३५ तर व्यापारी, हमाल, अडते मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या १८६ अर्जांचा समावेश आहे.

Beed Apmc Election
Yavatmal Apmc Election : ग्रामपंचायत सदस्य बदलविणार बाजार समितीचे राजकारण

छत्रपती संभाजीनगर मध्ये १३५० अर्ज

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी निवडणूक होते आहे. या बाजार समित्यांसाठी विविध मतदार संघाकरिता एकूण १३५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघातून ८२५, ग्रामपंचायत मतदार संघातून ३६८, व्यापारी-अडते मतदारसंघातून ९७ तर हमाल-मापाडी मतदारसंघातून दाखल झालेल्या ६० उमेदवारी अर्ज यांचा समावेश आहे.

फुलंब्री १४८, पैठण १२९, लासुर स्टेशन १६३, वैजापूर २४२, छत्रपती संभाजीनगर २२२, गंगापूर १९६ व कन्नड बाजार समिती मधून विविध मतदार संघासाठी एकूण २५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com