Agriculture Production : देशात भातासह तूर, उडीद तेलबियांच्या उत्पादनात घट

Pulses Production : देशभरात मॉन्सूनच्या पावसाने ओढ दिल्यामुळे भात, तूर, उडीद, तेलबिया आणि डाळवर्गीय पिकांच्या पेरणी क्षेत्राबरोबरच उत्पादनातही मोठी घट होण्याचा धोका केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
Agriculture Production
Agriculture ProductionAvgrowon
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील

Mumbai News : देशभरात मॉन्सूनच्या पावसाने ओढ दिल्यामुळे भात, तूर, उडीद, तेलबिया आणि डाळवर्गीय पिकांच्या पेरणी क्षेत्राबरोबरच उत्पादनातही मोठी घट होण्याचा धोका केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशभरात केलेल्या तृतीय पाहणी अंदाजानंतर ही आकडेवारी निश्चित केली असून, पावसाने सप्टेंबरमध्ये ओढ दिल्यास पिके वाया जाण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात भात उत्पादनात संभाव्य घट असून, डाळवर्गीय पिकांखालील क्षेत्रात २.७३ लाख हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. महाराष्ट्रात एकूण पेरणीक्षेत्रात ५ लाख हेक्टरची घट झाल्याचे समोर आले आहे.

Agriculture Production
Mung, Urad Disease : मूग, उडीद पिकांवरील रोगांचे नियंत्रण

महाराष्ट्रात मॉन्सूनचा पाऊस उशिरा आल्याने शेतीक्षेत्रात अनिश्‍चिततेचे वातावरण होते. परिणामी, तूर, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, भुईमूग या पिकांची पेरणी कमी झाली. तसेच ऊस लावणीवरही त्याचा परिणाम झाला. परिणामी, हे शेतकरी मका आणि सोयाबीनकडे वळल्याचा केंद्र सरकारचा अंदाज आहे.

उशिरा पेरणी आणि अपुऱ्या पावसामुळे तूर, उडीद, यांसारख्या पावसावर अवलंबून असलेल्या पिकांच्या उत्पादनात १० ते १५ टक्के घट होऊ शकते. कापूस आणि सोयाबीन ही पिके ऑगस्टपर्यंत चांगली असली तरी पाऊस झाला नाही तर त्यावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्रात १५५.०९ लाख हेक्टर पेरणी क्षेत्र असून, मागील वर्षी १५४.७३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र यंदा १४९. ६९ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Agriculture Production
Tur Processing : तूर प्रक्रिया ः चिंता अन् चिंतन

देशात डाळींचे उत्पादन घटणार

उशिरा आणि अपुऱ्या पावसामुळे डाळवर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे. देशात १३९. ७५ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घेतले जाते. यंदा मात्र केवळ ११७. ४४ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.

उशिराच्या आणि अपुऱ्या पावसामुळे तृतीय पाहणी अहवालानुसार महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकात १० ते १५ टक्के उत्पादनात घट होणार असून गुजरामध्ये पाच टक्के घट अपेक्षित आहे.

देशभरात भाताचे क्षेत्र वाढले असले तरी पश्‍चिम बंगाल, चंडीगड, ओडिशा, बिहार येथील भात उत्पादनात अनुक्रमे पाच टक्क्यांपासून दीड टक्क्यापर्यंत घट होऊ शकते असा अंदाज कृषी विभागाने व्यकत केला आहे. मागील वर्षी देशभरात ११० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते, तेच उत्पादन यंदा १०२ लाख मेट्रिक टनांवर येण्याची चिन्हे आहेत.

Agriculture Production
Oilseed: तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी 'एनडीडीबी' करणार प्रयत्न

तुरीला फटका

उशिरा आणि कमी पावसाचा कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील तुरीला फटका बसला आहे. महाराष्ट्रातील उत्पादनात दोन टक्क्यांची घट अपेक्षित धरली असून, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, लातूर, उमरावती, जालना, हिंगोली, सांगली, सोलापूर, अकोला येथील तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तेथील तुरीच्या उत्पादनात १० ते १५ टक्के घट अपेक्षित आहे.

आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही तुरीच्या उत्पादनात तितकीच घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भुईमुगाचे देशभरातील क्षेत्र कमी झाले असून, मागील वर्षी ७७. २० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते त्यात घट हाऊन तिसऱ्या पाहणी अंदाजानंतर ७४ लाख मेट्रिक टन उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यात गुजरातमध्ये पाच टक्के, आंध्र प्रदेशमध्ये १० टक्के, कर्नाटकात ५ टक्के उत्पादनात घट दर्शविली आहे.

देशातील पेरणीक्षेत्रात झालेली घट (लाख हेक्टरमध्ये)

डाळी १०.६३

तृणधान्य : २.०२

तेलबिया : १.८०

भुईमूग : १.१२

सूर्यफूल : १.२३

ताग आणि अंबाडी : २.२७

खरीप ज्वारी : १.१५

उडीद : ४.९८

तूर : २.२८

कापूस : २.२७

महाराष्ट्रातील पेरणीक्षेत्रात ऑगस्टअखेर झालेली घट (क्षेत्र लाख हेक्टरमध्ये)

भात : ०.०९

कडधान्य : २.७३

तूर : ०.४७

उडीद : १.५

मूग : १.२

तेलबिया : १.२१

भुईमूग : ०.१६

कापूस : ०.०७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com