Grape Export: द्राक्षांचा गोडवा जागतिक बाजारात: राज्यातून ८ हजार टनांवर निर्यात!

Agriculture Department: यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात सुरू झाली असून, युरोपियन आणि आखाती देशात ५५३ कंटनेरमधून ८ हजार ३०९ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. द्राक्ष निर्यातीस शेतकरी पुढे येत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
Grape
GrapeAgrowon
Published on
Updated on

Sangli News: यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात सुरू झाली असून, युरोपियन आणि आखाती देशात ५५३ कंटनेरमधून ८ हजार ३०९ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. द्राक्ष निर्यातीस शेतकरी पुढे येत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

यंदा द्राक्ष हंगामाला निसर्गाचा सतत अडथळा आला होता. त्यातच निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या फळ छाटण्या सप्टेंबर, ऑक्टोबरच्या दरम्यान, होतात. मात्र या दरम्यान, अवकाळी पावसामुळे फळ छाटणीला विलंब झाला. त्यामुळे हंगाम लांबणीवर गेला. तरीही शेतकऱ्यांनी नेटके व्यवस्थापन करत बागा साधल्या. राज्यातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी आजअखेर ४१ हजार ८२१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Grape
Grape Farming : ‘द्राक्ष व्यापाऱ्यांसाठी ‘क्यूआर कोड’

राज्यातून दर वर्षी आखाती देशात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तर युरोपियन देशात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातून निर्यातीचा प्रारंभ होतो. त्यानुसार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून फळ छाटणीचे नियोजन केले जाते. परंतु सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये फळ छाटणी वेळी आणि नंतर निसर्गचा अडथळा आला. हंगाम उशिरा सुरू झाल्याने यंदा द्राक्ष निर्यातीस आठ ते दहा दिवस विलंब झाला.

या वर्षी आखाती देशात द्राक्ष निर्यातीला डिसेंबरच्या मध्यापासून सुरुवात झाली आहे. तर युरोपिनय देशात निर्यात सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी झाला आहे. या कालावधीत राज्यातून ५५३ कंटनेरमधून ८ हजार ३०९ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. द्राक्ष निर्यातीस फारशी गती आली नाही.

Grape
Grape Season: द्राक्ष हंगामाला पंधरा दिवसांत गती येणार

सध्या द्राक्ष हंगामास पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक भागांत फेब्रुवारीपासून निर्यातीला गती येईल. राज्यात गत वर्षी द्राक्ष निर्यातीसाठी ४४ हजार २२० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ७ हजार ९१८ टन द्राक्षांची निर्यात झाली होती.

नोंदणीसाठी दोन वेळा मुदतवाढ

नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे फळ छाटणीचे वेळापत्रक शेतकऱ्यांना बदलावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणीची मुदत वाढवावी अशी मागणी केली. त्यानुसार दोन वेळा मुदत वाढवली असून निर्यात करण्याऱ्या शेतकऱ्यांची संख्येत वाढ होऊन निर्यातही वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

द्राक्ष निर्यात दृष्टिक्षेप

देश....कंटनेर...टन

युरोपियन...९८...११४५

आखाती....४५५...७१६४

एकूण....५५३...८३०९

निर्यातक्षम द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याने हंगाम उशिरा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत दर्जेदार द्राक्ष उत्पादनाचे आव्हान होते. त्यातूनही गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी काटेकोर नियोजन केल्याने शक्य झाले.
अमित गुरव, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, पळशी, ता. खानापूर, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com