Grape Season: द्राक्ष हंगामाला पंधरा दिवसांत गती येणार

Grape Farming: यंदा द्राक्ष शेतीसमोर अखंड अस्मानी संकट ओढावल्याने सुमारे ४० टक्के उत्पादन घट झाली आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी बागा वाचवल्या. यंदाच्या हंगामातील द्राक्ष आजअखेर १५ टक्के क्षेत्रावरील द्राक्ष विक्री झाली आहे.
Grape
Grape Agrowon
Published on
Updated on

Sangli News: यंदा द्राक्ष शेतीसमोर अखंड अस्मानी संकट ओढावल्याने सुमारे ४० टक्के उत्पादन घट झाली आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी बागा वाचवल्या. यंदाच्या हंगामातील द्राक्ष आजअखेर १५ टक्के क्षेत्रावरील द्राक्ष विक्री झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाच्या दरात प्रति किलोस २० ते २५ रुपये अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष हंगाम गोड झाला आहे.

राज्यात द्राक्ष पिकाचे क्षेत्र साडेचार लाख एकरांवर आहे. यंदा द्राक्ष फळ छाटणीच्या प्रारंभापासूनच नैसर्गिक अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि डाऊनी यासह अन्य संकटाची मालिका सुरू होती. त्यामुळे सूर्यप्रकाशाची कमतरता, मुळींची कार्यक्षमता मंदावली, या साऱ्याचा फटका पिकाला बसला. त्यातच घड जिरणे, घडकुज यामुळे घडांची संख्या कमी झाली. परिणामी, उत्पादनात ४० टक्क्यांनी घटले असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाने सांगितले.

Grape
Grape Farming : द्राक्ष शेतीमध्ये प्लास्टिक कव्हरचा योग्य वापर

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटावर मात करत, द्राक्ष बागा साधल्या. द्राक्ष विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्ष पट्ट्यात अंदाजे एक हजाराहून अधिक व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी दाखल झाले आहे. सध्या काढणीला आलेल्या द्राक्ष बागांची संख्या कमी आहे. त्यामुळे द्राक्ष हंगामास फारशी गती आली नाही. आजअखेर १५ टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची विक्री झाली आहे.

मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे गोडी येण्यास अडथळे निर्माण झाले होते. सध्या द्राक्ष पिकास पोषक वातावरण असल्याने गोडी येऊ लागली आहे. सध्या बाजारपेठेत अपेक्षित मागणी नसल्याने द्राक्ष खरेदीसाठी स्पर्धाही नाही. तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षाच्या दरात प्रति किलोस २० ते २५ रुपयांनी वाढले आहेत. येत्या पंधरा ते वीस दिवसांत द्राक्ष विक्रीची गती येणार स्पर्धेतून असून द्राक्षाचे दरही वाढतील, असा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Grape
Grape Farming : राज्यात द्राक्षाचे नेमके क्षेत्र किती?

निर्यातक्षम द्राक्षाच्या वाढ

राज्यातून गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वीच आखाती देशात द्राक्षाची निर्यात सुरू झाली आहे. नाशिक आणि सांगलीतून युरोपियन देशात द्राक्ष निर्यात नुकतीच सुरू झाली आहे. गतवर्षी निर्यातक्षम द्राक्षाला प्रति किलोस ७० ते ८० रुपये असा दर होता. यंदाच्या हंगामात निर्यातक्षम द्राक्षाचेही दर वाढले आहेत.

देशांतर्गत बाजारपेठेतील द्राक्षाचे दर (प्रति किलोस)

व्हाइट द्राक्ष : ६० ते ८०

रंगीत द्राक्ष : १०० ते १०५

फ्लेम सिडलेस : ७० ते ८०

Grape
Grape Production : द्राक्षाचे २५ टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता

निर्यातक्ष द्राक्षाचे दर (प्रति किलोस)

व्हाइट द्राक्ष : ८० ते १०० (आखाती देश)

व्हाइट द्राक्ष : १०० रुपयांच्या पुढे

रंगीत द्राक्ष : १०० ते १३५

यंदा अतिवृष्टी, परतीचा पाऊस या साऱ्याचा फटका बागांना बसला आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे. द्राक्षाचे दर वाढले असले, तरी एकंदर उत्पादन घटल्याने दर वाढीचा फायदा राज्यातील ६० टक्केच शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर २० टक्के शेतकऱ्यांच्या बागा काटावर आणि २० टक्के शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार असल्याची शक्यता आहे, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाने दिली.

यंदाचा द्राक्ष हंगाम नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून सुरू झाला आहे. हंगामाच्या प्रारंभापासून चांगले दर मिळत आहेत. सध्या देशांतर्गत आणि परदेशात द्राक्ष विक्रीची गती नाही. येत्या आठवड्याभरात द्राक्ष हंगामाला गती येईल.
कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ
यंदा द्राक्षाचे दर चांगले आहे. पण निसर्गाची अवकृपा यामुळे उत्पादन घटले असून, आर्थिक उत्पन्न कमी हाती येणार आहे.
विनायक पाटील, वायफळे, ता. तासगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com