Revenue Recovery : जळगावात विक्रमी १६४ कोटी महसूल वसुली

Revenue Department : जळगाव जिल्ह्याला प्रत्येक वर्षी महसुली वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. ते या वर्षीही १४५ कोटी रुपये दिले होते. या वर्षी त्या उद्दिष्टापेक्षा अधिकचे म्हणजे १६४ कोटी ४७ लाख एवढी महसूल वसूल केले.
Revenue Department
Revenue Department Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्याला प्रत्येक वर्षी महसुली वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. ते या वर्षीही १४५ कोटी रुपये दिले होते. या वर्षी त्या उद्दिष्टापेक्षा अधिकचे म्हणजे १६४ कोटी ४७ लाख एवढी महसूल वसूल केले. गेल्या वर्षी १२८ कोटी ८२ लाख उद्दिष्ट होते. त्यात ११७ कोटी बारा लाख वसूल झाले होते. म्हणजे या वर्षी तब्बल ५३ कोटी पेक्षा अधिकची वसुली झाली. उद्दिष्टांपेक्षा २१ कोटी रुपयाची अधिकची वसुली महसूल यंत्रणेचे केली आहे.

महसूल विभागाकडे जिल्ह्यातील सर्व प्रकारची काम सांभाळून वेगवेगळ्या प्रकारच्या महसूली वसुलीचे काम असते त्यात गौण खनिज, जमीन महसूल, नजराण्याचे प्रकरण इत्यादी प्रकार येतात. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यात घातलेलं लक्ष, महसूल यंत्रणेतील तलाठ्यापासून ते मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (महसूल), अपर जिल्हाधिकारी यांनी केलेले विशेष प्रयत्न त्यामुळे आजपर्यंत झाली नव्हती एवढी वसुली झाली आहे.

Revenue Department
Revenue Department : तुळजापूर शहर भूमीअभिलेख कार्यालय बनले समस्यांचे आगार

ही महसुली वसुली नाशिक महसूल विभागातील सर्वाधिक वसुली असल्याचेही महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनेक विभागांत अव्वल कामगिरी केलेल्या जळगाव जिल्ह्यात ‘आयएसओ’ मानांकन मिळविणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांची राज्यात सर्वाधिक आहे. यातून गुणवत्तापूर्ण अधिक पारदर्शी काम दिसते.

Revenue Department
Revenue Law : महसुली कायद्यांमध्ये सुधारणांसाठी समिती

महसूल अभिलेख त्रुटीरहित ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी करून द्यावयाचे घोषणापत्र क्रमांक ४ जिल्ह्यातील सर्व महसुली गावांचे पूर्ण झाले असून, असे करणारा जळगाव राज्यातील एकमेव जिल्हा आहे. ई-चावडी प्रकल्पाची अंमलबजावणी १०० टक्के जळगाव जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यामुळे शासकीय कामाला गती आली आहे. ‘रोहयो’ योजनेची अंमलबजावणी मध्ये जळगाव जिल्ह्याने १०० टक्के कार्यवाही पूर्ण केली आहे.

तालुकानिहाय वसुली अशी...

तालुका एकूण टक्केवारी

जळगाव २७ कोटी ७७ लाख १२ हजार १०८.४८

जामनेर १३ कोटी १७ लाख ९७ हजार १२५.५२

एरंडोल ११ कोटी ५५ लाख ९१ हजार ११८.५५

धरणगाव ९ कोटी ५८ लाख ४२ हजार १०६.४९

पारोळा ५कोटी २५ लाख ५ हजार ११६.६८

भुसावळ १४ कोटी ९ लाख ७२ हजार ११४.१५

बोदवड ४ कोटी ९३ लाख ८७ हजार १२०.४६

मुक्ताईनगर १३ कोटी ५८ लाख ४ हजार १२०.४६

रावेर ८ कोटी ५६ लाख ९०हजार २२०.८२

यावल ७ कोटी ८ लाख २० हजार ८७.४३

अमळनेर १० कोटी १६ लाख ९६ हजार ८७.४३

चोपडा ६ कोटी ४८ लाख ९४ हजार ८१.२२

पाचोरा १० कोटी ६० लाख २८ हजार १११.६१

भडगाव ६ कोटी ६२ लाख १२९.८१

चाळीसगाव १३ कोटी ४२ लाख ८३.९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com