Agriculture Well : ‘रोहयो’तून ७ हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार विहिरी

Rojgar Hami Yojana : चालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात ७ हजार ९५ सिंचन विहिरींची कामे चालू आहेत. यासाठी २८३ कोटी ८० लाखांचा खर्च करण्यात येणार आहेत.
Agriculture Well
Agriculture WellAgrowon

Dharashiv News : चालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात ७ हजार ९५ सिंचन विहिरींची कामे चालू आहेत. यासाठी २८३ कोटी ८० लाखांचा खर्च करण्यात येणार आहेत. एका विहिरीसाठी ४ लाख रुपये रोजगार हमी योजनेतून खर्च करण्यात येतो. यातून आगामी काळात ७ हजार ९५ शेतकरी बागायतदार शेतकरी होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागातुन ही माहिती देण्यात आली आहे.

४० टक्के कुशल आणि ६० टक्के अकुशल रक्कम विहिरीसाठी खर्च करण्यात येते. रोजगार हमी योजनेतील मजुरांसाठी ६० टक्के म्हणजे २ लाख चाळीस हजार इतकी रक्कम दर आठवड्यास संबंधित मजुरांच्या बँक खात्यावर कामाच्या मोबदल्यात जमा करण्यात येते. ही रक्कम पूर्ण होईपर्यंत मजुरांना या कामाची मजुरी दिली जाते. विहिरीवर बांधण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट रिंगचे काम पूर्ण झाल्यास संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर कुशल कामांची ४० टक्के म्हणजे १ लाख ६० हजार इतकी रक्कम वर्ग करण्यात येते. असे जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Agriculture Well
Agriculture Well Scheme : सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांना विहिरी

दरम्यान मागील आर्थिक वर्षात अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरींची संख्या २ हजार ५०६ इतकी आहे. चालू आर्थिक वर्षात मंजुरी मिळालेल्या सिंचन विहिरींची संख्या ४ हजार ५८९ इतकी आहे. यापैकी १ हजार ३४२ सिंचन विहिरींचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले

आहे. मागील आर्थिक वर्षात अपूर्ण राहिलेल्या विहिरी आणि चालू आर्थिक वर्षात मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू झालेल्या एकूण विहिरींची संख्या ३ हजार ८४८ इतकी आहे. मात्र मागील आर्थिक वर्षात अपूर्ण राहिलेल्या विहिरी आणि चालू आर्थिक वर्षात मंजुरी मिळालेल्या विहिरी मिळून एकूण ७ हजार ९५ विहिरी भविष्यात निर्माण होऊ शकतात.

Agriculture Well
Agriculture Well : राज्यात पाच वर्षांत दहा लाख सिंचन विहिरी

मागील आणि आता मंजुरी मिळालेल्या विहिरी ८३२

भूम तालुक्यात मागील आर्थिक वर्षातील अपूर्ण व चालू वर्षात मंजुरी मिळालेल्या मिळून ८३२ इतकी विहिरी आहेत. कळंब तालुक्यात ९३०. लोहारा तालुक्यात २९८. उमरगा तालुक्यात ३९८. धाराशिव तालुक्यात २०२. परंडा तालुक्यात २ हजार १२१. तुळजापूर तालुक्यात १ हजार ७४१. वाशी तालुक्यात ६७३ इतक्या विहिरींच्या कामांची संख्या आहे. यावरून सर्वाधिक विहिरींच्या कामांची संख्या परंडा तालुक्यात तर सर्वात कमी धाराशिव तालुक्यात आहे.

विहिरींची कामे पूर्ण झाल्यास टंचाई होईल दूर

जिल्ह्यात सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. सर्वत्र पाणीटंचाईची भीषणता जाणवत आहे. या स्थितीत या सर्व विहिरींची कामे पूर्ण झाल्यास आगामी काळात ७ हजारांवर शेतकरी बागायतदार होऊ शकतात. विहिरी पाणीदार होऊ शकतात. परिणामी भविष्यातील पाणीटंचाई निवारणावर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com