Animal Care : दुधाळ जनावरांना कसा आहार द्याल?

Team Agrowon

आहारावर ७० टक्के खर्च

जनावरांच्या आहारावर जवळपास ७० टक्के खर्च होतो. आहाराकडे विशेष लक्ष दिले तर दूध उत्पादन किफायतशीर होते, आरोग्य व प्रजनन उत्तम राहते.

Animal Care | Agrowon

द्विदल, कडधान्य चाऱ्याचे मिश्रण

चांगल्या प्रतीची प्रथिने, इतर पोषक द्रव्ये मिळण्यासाठी हिरवा चारा देताना, त्यामध्ये द्विदल चारा जसे की, लुसर्न, बरसीम, मूग, भुईमूग, उडीद यासोबत मका, ज्वारी इत्यादीचे १:३ प्रमाण असावे.

Animal Care | Agrowon

खनिज, क्षार मिश्रणाचा वापर

चांगल्या दर्जाचे खनीज, क्षार मिश्रण निवडावे. खनिजाच्या आहारातील अभावामुळे जनावरास बरेच आजार होतात, दूध उत्पादन कमी होते, वंधत्व येते, जनावर माजावर येत नाही.

Animal Care | Agrowon

खाद्यातील बदल, देण्याची वेळ

पशुखाद्य किंवा चाऱ्यात एकदम बदल केल्यास, जनावरे पाहिजे त्या प्रमाणात चारा खात नाहीत. कमी चारा खाल्ल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Animal Care | Agrowon

चारा प्रक्रिया

कोरडा चारा पाण्यामध्ये भिजवून नंतर खाण्यास द्यावा. चाऱ्याची कुट्टी करून द्यावी. निकृष्ट चाऱ्यावर तज्ञांच्या मार्गदर्शनाने प्रक्रिया करावी.

Animal Care | Agrowon

जंतनाशकाचा वापर

जंताच्या प्रादुर्भावामुळे वासरू खंगत जाऊन वाढ खुंटते, पोटाचे आकारमान वाढते, त्वचा खरखरीत होऊन केस गळतात.

Animal Care | Agrowon

खुराकाचे नियोजन

गाई, म्हशीचे दूध आटविल्यानंतर खुराक बंद न करता वासरांच्या वाढीकरिता किमान अडीच किलो खुराक सुरू ठेवावा. जेणेकरून गर्भात वासराची योग्य वाढ होऊन प्रजननातील अडथळे दूर होतात. वासरे सुदृढ जन्माला येतात.

Animal Care | Agrowon
आणखी पाहा...