Fish Seed Storage : रंकाळा मत्स्यबीज केंद्रात ५० लाख बीजांचे संगोपन

Rankala Fish Seed Center : रंकाळा मत्स्यबीज केंद्रामध्ये आगामी मत्स्य हंगामासाठी ५० लाख मत्स्य बीजांचे (जिरे) संगोपन केले जात आहे.
Fish Seed s
Fish SeedsAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : रंकाळा मत्स्यबीज केंद्रामध्ये आगामी मत्स्य हंगामासाठी ५० लाख मत्स्य बीजांचे (जिरे) संगोपन केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमारांना याचा फायदा होणार असून मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होणार आहे.

वरुणराजाची कृपादृष्टी झाल्यामुळे कळंब्यासह जिल्ह्यातील अनेक नदी, तलाव, विहिरी तुडुंब भरल्या असून मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादनाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या हंगामात मुबलक प्रमाणात मत्स्यबीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, तीन दिवसांमध्ये जिल्ह्यातील अनेक मच्छीमारांना सहा लाखांहून अधिक मत्स्य बीजांचे वितरण केले आहे.

Fish Seed s
Fish Seeds : मत्स्यबीजाची निवड, व्यवस्थापनाचे नियोजन

शासनाने यंदाच्या मत्स्य बिजांचा ठेका कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघ यांना देण्यात आला असून शासनाला पाच लाखांहून अधिक रुपयांचे उत्पन्न यामधून मिळेल. शासन मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या अंतर्गत रंकाळा येथे मत्स्यसंवर्धन केंद्र उभारले आहे. येथे लहान-मोठे अकरा तलाव आहेत.

त्यामध्ये संघाने मत्स्य नर्सरी तयार केली असून जूनमध्ये ५० लाख मत्स्य जिरे आणून सोडली होती. दोन महिन्यांच्या संगोपनानंतर मच्छीमारांना मत्स्य बिजे वितरित केली जात आहेत. तत्काळ व उच्च दर्जाची मत्स्य बीजे उपलब्ध झाल्यामुळे मच्छीमारांमधून समाधान व्यक्त होत आहे. २०२३ मधील पावसाळ्यात अनियमित पाऊस पडल्यामुळे नदी, तलावात काठोकाठ पाणीसाठा झाला होता.

Fish Seed s
Fish Seed Storage : मत्स्यबीज संचयनाचे नियोजन

तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले होते. बेसुमार पाणी उपसा केल्यामुळे फेब्रुवारी, मार्चमध्येच नदी तलावांचे पात्र मोठ्या प्रमाणात कोरडे पडले होते. त्यामुळे गतवर्षी मत्स्य उत्पादनात घट झाली होती. त्याचा मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे.

यंदा जून, जुलैमध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे नदी, तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने मत्स्य उत्पादनाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. या जलसाठ्यामध्ये मत्स्य जिरे आणून सोडण्यासाठी मच्छीमार बांधवांची लगबग सुरू आहे. रोह, कटला, कॉमन कार्प, ग्रास कार्प यांसह अनेक जातींच्या ५० लाख मत्स्य बिजांचे संगोपन केले जात असून मच्छीमारांना त्यांचे वितरण सुरू केले आहे.

जिल्ह्यात २० हजारांहून अधिक मच्छीमार

नदी, तलाव जलक्षेत्रातील ४ हजार ४०० हेक्टरमध्ये मासेमारी केली जाते. गोड्या पाण्यामुळे या माशांना विशिष्ट चव असल्यामुळे बाजारपेठेमध्ये त्यांना चांगली मागणी आहे. जिल्ह्यात २० हजारांहून अधिक मच्छीमार बांधव असून बारमाही मासेमारी केली जाते.

दोन महिन्यांच्या संगोपनानंतर रंकाळा मत्स्यबीज केंद्रामध्ये उत्तम दर्जाचे मत्स्य जिरे उपलब्ध झाले आहेत. याचा मत्स्य उत्पादन वाढीसाठी मच्छीमार बांधवांना चांगला उपयोग होणार आहे. योग्य दरात त्यांना ही मत्स्य बिजे वितरित केली जात आहेत.
दत्तराज शिंदे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती मत्स्य व्यवसाय सहकारी संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com