साक्षी जिवतोड, डॉ.विजया पवार
Importance of Turmeric : हिवाळ्यात हळदीचे सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि तापापासून शरीराचे संरक्षण होते. हळद खाल्ल्याने शरीर उबदार राहते. कच्च्या हळदीमध्ये हळद पावडरच्या तुलनेत जास्त गुणधर्म असतात. कच्ची हळद ही ज्यूस, दूध तांदळाचे पदार्थ, लोणचे,चटणी आणि सुपामध्ये मिसळून वापरता येते.
हळदीचे महत्त्व :
कच्च्या हळदीमध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म आहे. विशेषतः पुरुषांमध्ये होणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींना वाढण्यासह त्यांचा नायनाट देखील करतात. ट्यूमरपासून संरक्षण करते.
हळदीमध्ये सूज रोखण्याचे विशेष गुणधर्म आहे. याचा वापर संधिवाताच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हे शरीरातील नैसर्गिक पेशींना संपविणाऱ्या रॅडिकल्सचा नायनाट करतात आणि संधिवाताने होणाऱ्या सांध्यातील वेदनेमध्ये आराम देतात.
कच्च्या हळदीमध्ये इन्शूलिन पातळी संतुलित ठेवण्याचा गुणधर्म आहे. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. इन्शुलिनच्या व्यतिरिक्त ग्लुकोज नियंत्रित करते ज्यामुळे मधुमेहाच्या दरम्यान देण्यात आलेल्या उपचाराचा प्रभाव वाढतो. परंतु आपण जे औषध घेत आहात ते जास्त प्रमाणात असेल तर हळदीचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
हळदीमध्ये लिपोपायलिसॅराइड नावाचा घटक असतो, जो शरीरात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. हळद शरीरातील जिवाणूंच्या समस्येस प्रतिबंध करते. हळद बुरशीजन्य संक्रमणापासून शरीराचे रक्षण करते. शरीराला ताप येण्यापासून वाचवते.
हळदीचा सतत वापर केल्याने कोलेस्टरॉल सिरमची पातळी शरीरात नियंत्रणात राहाते.
कच्च्या हळदीत जिवाणू विरोधक गुणधर्म आढळतात. सोरायसिस आजारावर नियंत्रण मिळविता येते.
हळदीचा वापर त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आहे.
कच्च्या हळदीपासून बनलेला चहा अत्यंत फायदेशीर पेय आहे. या मुळे प्रतिकारक शक्ती वाढते.
हळदीमध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म आहेत.
हळद यकृताला निरोगी ठेवते. ते सहजतेने काम करते.
हळद मिश्रित दूध :
हळद मिश्रित दूध बनवताना त्यामध्ये काळी मिरी मिसळावी.
हे मिश्रण तयार करताना अर्धा कप कोमट दुधात एक चतुर्थांश चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळावी.
हळदीच्या दुधात गोडवा येण्यासाठी फक्त गूळ वापरावा. हिवाळ्यात गुळाचे सेवन फायदेशीर आहे.
हळद-तुळस मिश्रण :
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हळद आणि तुळशीचे मिश्रण फायदेशीर आहे. तुळस आणि हळदीचे मिश्रण प्यायल्याने अनेक आजारांपासून सुरक्षित राहता येते.
एका पातेल्यात थोडे पाणी घ्यावे. त्यात १ चमचा हळद आणि ८ ते १० तुळशीची पाने घालावीत. त्यात थोडे आले घालावे. हे सर्व मिश्रण चांगले उकळावे.
लोणचे :
साहित्य : कापलेली ओली हळद एक वाटी, कापलेले अर्धा वाटी आले, अर्धा वाटी हिरवी मिरची, अर्धा वाटी लिंबू रस, चवीपुरते मीठ.
कृती :
ओली हळद आणि आले स्वच्छ धुऊन साल काढून तुकडे करावेत. हिरवी मिरची बारीक कापून घ्यावी.
बारीक केलेली हळद, आले व मिरची एकत्र करून मीठ, लिंबूरस टाकून मिसळावे. भाजलेली मोहरी व मेथी दाणे यांची जाडसर पावडर करावी. तेल तापवून थंड करावे.
चवीप्रमाणे लोणचे मसाला मिळावा. इतर सर्व मिश्रणात हे मिसळावे. काचेची बरणी थोडी तापवून हे मिश्रण नंतर त्यात भरावे. झाकण घट्ट लावून सात ते आठ दिवस उन्हात ठेवावे.
हळद वापरताना काळजी
ज्या लोकांना हळदीची ॲलर्जी आहे त्यांना पोटात वेदना किंवा अतिसार सारखी लक्षणे दिसतात.
गरोदर बायकांनी कच्च्या हळदीचा वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काही वेळा हळदीमुळे रक्त गोठण्यावर परिणाम होऊ शकतो.
हळदीमुळे रक्तप्रवाह वाढतो. म्हणून एखाद्याची शस्त्रक्रिया व्हायची असेल तर त्यांनी कच्च्या हळदीचे सेवन करू नये.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.