Ravikant Tupkar : स्वाभिमानी`त फुट अटळ? पुण्यातील बैठकीला रविकांत तुपकरांची दांडी
Ravikant Tupkar vs Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे नाराज असून त्यांनी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टींच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला आहे. या वादामुळे 'स्वाभिमानी'त फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या शिस्तपालन समितीची बैठक आज पुण्यात बोलावण्यात आली आहे. परंतु या बैठकीला आपण जाणार नाही, असे तुपकर यांनी जाहीर केले आहे.
तुपकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही आमचे म्हणणे वरिष्ठांना, राजू शेट्टींना वारंवार कळवले आहे. बैठकीत नेते काय भूमिका ठरवतात हे पाहू, त्यानंतर निर्णय स्पष्ट करू. अशा इशाराच तुपकरांनी दिला आहे.
तुपकर म्हणाले, ``स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची काही दिवसांपूर्वी बुलढाण्यात सभा झाली. या सभेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात सगळ्यांनी आपली मते मांडली. गेल्या अनेक वर्षांपासून मी लोकसभेच्या बुलढाणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. पण समविचारी पक्षांशी वाटाघाटी करीत असताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांना ती जागा मिळवता आली नाही. त्यानंतर विधानसभा निवडणूकीतही तयारी करत असताना नेत्यांनी साथ दिली नाही.``
वरिष्ठ नेते अनेक वेळा बुलढाणा जिल्ह्यात आले. मात्र, आम्हाला कळवले जात नाही, असा आरोपही तुपकरांनी केला. आपल्याला विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे. याबाबत नेत्यांच्या कार्यपध्दतीवर अनेक वेळा आक्षेप घेतला. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही, असे तुपकर म्हणाले.
मागील काही दिवसांपासून तुपकर दुसऱ्या पक्षात जाणार किंवा स्वाभिमानीचाच दुसरा गट स्थापन करणार, अशी चर्चा घडवून आणली जात आहे. तसेच हा संघटनेतील जिल्हा स्तरावरील वाद असल्याचे चित्र रंगवले जात आहे. पण हे खरे नाही. मी संघटनेमध्येच राहून राज्यभरात तरुणांची फौज उभी करणार आहे, असे तुपकर यांनी स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दबाव गट आहे. त्याच प्रकारचा दबाव गट मराठवाडा, विदर्भात सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचा गट तयार करणार आहे, असे तुपकरांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात आज शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक आहे. या बैठकीत तुपकर यांनी आपली बाजू मांडावी, असे शेट्टी यांनी म्हटले होते. परंतु या बैठकीला दांडी मारून तुपकरांनी ताठर भूमिका घेतल्याचे मानले जात आहे.
तुपकरांनी काही दिवसांपूर्वी नाव न घेता राजू शेट्टींवर टीका केल्यानंतर भाजप नेते आशिष देशमुख यांनी तुपकरांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात आज शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक आहे. या बैठकीत तुपकर यांनी आपली बाजू मांडावी, असे शेट्टी यांनी म्हटले होते. परंतु या बैठकीला दांडी मारून तुपकरांनी ताठर भूमिका घेतल्याचे मानले जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.