Kolhapur Rathotsav : कोल्हापुरात अंबाबाईचा रथोत्सव साजरा

Ambabai Temple : ‘करूया उदो उदो अंबाबाईचा...’ अशा जयघोषात बुधवारी (ता. २४) रात्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव झाला.
Ambabai Rathotsav
Ambabai Rathotsav Agrowon

Kolhapur News : ‘करूया उदो उदो अंबाबाईचा...’ अशा जयघोषात बुधवारी (ता. २४) रात्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव झाला. श्रद्धा, मांगल्य, वात्सल्य, भक्ती, दया, करुणा असे विविध भाव मनी घेऊन आलेल्या हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. पारंपरिक दिमाखात निघालेल्या रथोत्सवाने प्रसन्नतेचा भाव जागविला.

परंपरेनुसार चैत्र महिन्यातील जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रथोत्सव साजरा होतो. त्यानुसार हा रथोत्सव झाला. महाद्वारातून रथोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते रथपूजन झाले.

Ambabai Rathotsav
Kolhapur Drought Condition : कोल्हापुरातील पूर्व भागातील नद्यांवर १२ दिवस उपसाबंदी, पिके वाळण्याची शक्यता

या वेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीचे सचिव महादेव दिंडे, शिवराज नाईकवडे, महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी आदी उपस्थित होते.

Ambabai Rathotsav
Agriculture Irrigation : ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही

रथोत्सव परिसर उजळला

देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने सोहळा संयोजन झाले. रथोत्सवाच्या मार्गावर रांगोळी, फुलांच्या पायघड्या होत्या. त्यावरून मानकऱ्यांनी रथ चालवीत मार्गस्थ केला. पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी पुष्पवृष्टी केली.

तर रथासोबत करवीर नाद ढोलपथकाने ढोलवादन करीत उत्साह वाढविला. पोलिस बॅण्ड पथक, पारंपरिक बॅण्ड पथकाने सूर-तालाची साथ देत रथोत्सव सुरेल केला. रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने रथोत्सव व परिसर उजळून निघाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com