Kolhapur Drought Condition : कोल्हापुरातील पूर्व भागातील नद्यांवर १२ दिवस उपसाबंदी, पिके वाळण्याची शक्यता

River Condition In Kolhapur : पूर्वेकडील नदीपात्रातील पाणी झपाट्याने आटत चालले आहे. त्यामुळे पिकांना पाणी पुरेनासे झाले आहे.
Kolhapur Drought Condition
Kolhapur Drought Conditionagrowon

Kolhapur Rivers : हिरण्यकेशी नदीतील पाणी उपशावर आजपासून (ता. २६) बारा दिवस उपसाबंदी लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारपासून (ता.२५) चित्री प्रकल्पातील पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. पूर्वेकडील नदीपात्रातील पाणी झपाट्याने आटत चालले आहे. त्यामुळे पिकांना पाणी पुरेनासे झाले आहे.

चित्री प्रकल्पातील सोडण्यात येणारे पाणी निश्चित ठिकाणी (खोत बंधारा) गतीने जावे, याकरिता पाटबंधारे विभागाने या दरम्यान पाणी उपशावर बंदी घालण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला आहे. त्यानुसार या महिन्याचे उपसाबंदीचे नियोजन केले आहे. ७ मे रोजी पुन्हा उपसा सुरू होणार आहे.

दरम्यान, पूर्व भागातील शेतीला पाणी कमी पडू लागले आहे. पाणी आल्यापासून अवघे आठच दिवस पात्रात टिकून राहत आहे. त्यानंतर पात्रातील पाणी आटत चालल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्याची अडचण तयार झाली आहे.

दरम्यान, या वर्षी 'आंबेओहोळ 'मधील पाण्याचे एकही आवर्तन अद्याप हिरण्यकेशी नदीला घेतलेले नाही. या प्रकल्पाचे लाभक्षेत्र गिजवणे बंधाऱ्यापर्यंत आहे. गत वर्षी या प्रकल्पातील पाणी घेतले होते. परंतु लाभक्षेत्राबाहेर पाणी दिल्याने पाटबंधारे खात्यावर आरोप झाले. त्यामुळे यंदा अद्यापही पाणी घेतलेले नाही. फारच टंचाईची शक्यता भासू लागली, तरच परवानगीने पाणी घेण्याचे नियोजन आहे. मात्र 'आंबेओहोळ'मधील पाणी घेण्याबाबतचे आदेश अद्यापही आलेले नसल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले.

Kolhapur Drought Condition
Kolhapur Market Rate : आंब्याचे दर आवाक्यात तर भाजीपाला दरात तेजी, काय आहे मार्केट स्थिती?

उन्हाळा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे जमिनी तहानलेल्या आहेत. पाणी देईल तितके कमी पडत आहे. एकच वळीव पाऊस झाल्याने तोसुद्धा काही ठरावीक भागातच पडला आहे. वळीव न पडलेल्या ठिकाणी पाण्याची कमतरता भासत आहे. 'चित्री'चा पाणीसाठा ४५ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी सोडण्यात येणारे हे उन्हाळ्यातील शेवटचे आवर्तन असून आवश्यकता भासलीच तर जूनमध्ये एक आवर्तन देण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याचे आहे. पिण्यासाठी राखीव पाणीसाठा ठेवूनच जूनचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दृष्टिक्षेपात

पाणी जपून वापरण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

अधिकारी निवडणुकीत, उपसाबंदी वाऱ्यावर अशी स्थिती नको

अपेक्षित वळीव पाऊस नसल्याने पाणीसाठा अपुरा पडण्याची शक्यता

जमिनी तहानल्याने पिकाची वाढ खुंटली

निलजी बंधाराखालील नदी पात्रातून चारच दिवस शेतीला पाणी मिळत असल्याने ऊस पीक धोक्यात

गरज लागली तरच शेवटचे आवर्तन उपसाबंदीचा एक दिवस कमी करून दोन दिवसांनी वाढवली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com