Tur, Chana Market : तूर, हरभऱ्याच्या किमतींत वाढ

Future Market : सध्या तूर वगळता इतर सर्व पिकांची आवक कमी होत आहे. गेल्या सप्ताहात तुरीची विक्रमी आवक झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या आवकेपेक्षा ती अधिक होती.
Tur, Chana Market
Tur, Chana MarketAgrowon

फ्यूचर्स किमती ः सप्ताह ३ ते ९ फेब्रुवारी २०२४

Cotton Market : ९ फेब्रुवारीपासून MCX मध्ये कापसासाठी मे २०२४ डिलिव्हरीचे व्यवहार सुरू झाले. (जानेवारीमध्ये जुलै डिलिव्हरीचे कापसासाठी व्यवहार चालू होणार होते; ते आता लांबणीवर टाकले आहेत.) त्यामुळे आता MCX मध्ये कापसासाठी मार्च व मे डिलिव्हरीचे, तर कपाशीसाठी फेब्रुवारी व एप्रिलचे व्यवहार चालू आहेत.

सध्या तूर वगळता इतर सर्व पिकांची आवक कमी होत आहे. गेल्या सप्ताहात तुरीची विक्रमी आवक झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या आवकेपेक्षा ती अधिक होती. मात्र मागणी अधिक आहे. आयात कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाचा साठा संपुष्टात आला आहे. यामुळे किमती वाढत आहेत. कांद्याच्या किमतीतील घसरण रब्बी आवकेच्या संभाव्य वाढीमुळे होत असल्याची शक्यता आहे.

या सप्ताहात हळद व कांदा वगळता सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या.

९ फेब्रुवारी २०२४ रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्याने घसरून रु. ५५,६०० वर आले होते. या सप्ताहात ते १.१ टक्क्याने वाढून रु. ५६,२०० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव १.६ टक्क्याने वाढून रु. ५८,६८० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.४ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.९ टक्क्याने वाढून रु. १,३८८ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५३० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १०.३ टक्क्यांनी अधिक आहेत. हेजिंग करण्यासाठी या भावांचा विचार करावा. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट भाव यापेक्षा कमी आहेत, पण फेब्रुवारी व एप्रिल भाव मात्र अधिक आहेत.

Tur, Chana Market
Commodity Market : मका, हळद, तूर, हरभऱ्याच्या किमतींत वाढ

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात २.३ टक्क्यांनी वाढून रु. २,२५० वर आले आहेत. फ्यूचर्स (मार्च) किमती रु. २,२६८ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. २,२९५ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.६ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात १.१ टक्क्याने वाढून रु. १३,९८७ वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने घसरून रु. १३,८८० वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती १.७ टक्क्याने घसरून रु. १५,१६६ वर आल्या आहेत. जून किमती रु. १५,४६८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ११.४ टक्क्यांनी जास्त आहेत. या तेजीचा अजूनही फायदा करून घेता येईल.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात ४.९ टक्क्यांनी वाढून रु. ५,९०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,९०० वर स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात ३.७ टक्क्यांनी घसरून रु. ४,६२१ वर आली होती. या सप्ताहात ती १.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,६९७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

Tur, Chana Market
Chana Market: हरभऱ्याच्या भावात अचानक वाढ का दिसत आहे? |Agrowon| ॲग्रोवन

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ९,५५८ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा १.८ टक्क्यांनी वाढून रु. ९,७३५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीचा आवक हंगाम सुरू झाला आहे. २९ डिसेंबरपासून आवक वाढती आहे. २ फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात देशातील आवक ६६,००० टन झाली. गेल्या वर्षी ३ सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या सप्ताहात ती ६४,००० टन होती आणि ती त्या वर्षाची विक्रमी आवक होती. मात्र या वर्षी एकूण पुरवठा कमी होण्याची शक्यता वाटत असल्याने किमतीत वाढ होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,०९० होती; या सप्ताहात ती रु. १,०६४ वर आली आहे. आवक वाढत आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,००० वर आली होती. या सप्ताहात ती रु. २,२०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com