Rare Plant : तिलारीच्या जंगलात आढळली कचूर वनस्पती

Tilari Reserve Forest : राज्यात प्रथमच या वनस्पतीची नोंद झाली आहे. श्री. सावंत यांना तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रात सप्टेंबर २०२४ मध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती दिसून आली.
Kachur Rare Plant
Kachur Rare PlantAgrowon
Published on
Updated on

Sindhudurga News : जिल्ह्यातील तिलारी (ता. दोडामार्ग) संवर्धन राखीव क्षेत्रात वनश्री फाउंडेशनचे संजय सावंत यांना कचूर (बोसेनबर्गिया टिलीफोलिया) ही वनस्पती आढळून आली आहे. राज्यात प्रथमच या वनस्पतीची नोंद झाली आहे.

श्री. सावंत यांना तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रात सप्टेंबर २०२४ मध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती दिसून आली. या वनस्पतीची छायाचित्रे त्यांनी वनस्पतिशास्त्र अभ्यासक डॉ. प्रा. विजय पैठणे आणि संभाजीनगर येथील वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल भुक्तार यांना पाठवून दिली. श्री. पैठणे आणि डॉ. भुक्तार यांनी तमिळनाडू वनस्पती शास्त्रज्ञांसमवेत चर्चा केल्यानंतर ती वनस्पती बोसेनबर्गिया टिलिफोलिया असल्याचे स्पष्ट झाले.

Kachur Rare Plant
Rare Paddy Variety : शिराळा तालुक्यात सुधारित, दुर्मीळ भात वाणांची प्रात्यक्षिके

मराठीत या वनस्पतीला कचूर किवा कचूरकपारी असे म्हटले जाते. या वनस्पतीला निलगिरी फिंगररूट या नावानेदेखील ओळखले जाते. अधिकतर ही वनस्पती कर्नाटक, तमिळनाडू, केरळमध्ये आढळून येते. नुकतीच या वनस्पती संशोधनाची नोंद जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सामध्ये झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि राज्यांच्या जैवविविधतेत आणखी एका वनस्पतीची नोंद झाली आहे.

Kachur Rare Plant
Rare Plants In Sindhudurg: सिंधुदुर्गात आढळल्या तीन दुर्मीळ वनस्पती
बोसेनबर्गिया टिलीफोलिया ही आल्याच्या कुळातील वनस्पती आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ही वनस्पती फुलते आणि डिसेंबरनंतर या वनस्पतीची पाने सुकत असल्याने ती नाहीशी होतात. पावसाळ्यात पुन्हा रायझोममधून ती उगवते.
- डॉ. विजय पैठणे, वनस्पती शास्त्रज्ञ, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी
तिलारीच्या घनदाट जंगलात आढळून आलेल्या या वनस्पतीमुळे येथील जैवविविधतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे त्या वनस्पतीचे संरक्षण होणे आवश्यक आहे.
- संजय सावंत, अध्यक्ष, वनश्री फाउंडेशन, दोडामार्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com