Raju Shetti : पराभवानंतर राजू शेट्टी यांची फेसबुक पोस्ट; शेतकऱ्यांना विचारला प्रश्न

Lok Sabha Election Result 2024 : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील धैर्यशील माने यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पराभव केला.
Raju Shetti
Raju Shettiagrowon

Pune News : राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता.४) लागला. यंदा अनेक दिग्गजांचा सुपडासाफ झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांचा देखील पराभव झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी शेट्टी यांच्यासह उद्धव ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सरूडकर यांचा पराभव केला. माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांचा १४,७२३ मतांनी निसटता पराभव झाला. मात्र शेट्टी यांचा पराभव ३ लाखांहून अधिक मतांनी झाल्याने हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत थेट मतदासंघातील शेतकऱ्यांना प्रश्न केला आहे. यामुळे सध्या सोशल मिडियावर खळबळ उडालेली असून लोक सहानुभूती व्यक्त करत आहेत.

राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात अनेक ठिकाणी रंगतदार लढती समोर आल्या. बारामतीसह कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. तर हातकणंगले लोकसभा मतदार संघाकडे राज्याचे विशेष लक्ष लागले होते. येथे आजी-माजी खासदारांसह एका माजी आमदारात लढत लागली होती. ज्यात माजी आमदारासह माजी खासदार असणाऱ्या राजू शेट्टी यांचा दारूण पराभव झाला.

Raju Shetti
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निकालानंतर कोण काय म्हणाले?

या पराभवानंतर आता शेट्टी यांनी एक फेसबुक पोस्ट केली. ज्यात शेट्टी यांनी जनतेसह शेतकऱ्यांना प्रश्न विचारला आहे. शेट्टी यांनी, माझं काय चुकलं? असा सवाल केला असून प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? असं म्हटले आहे. यामुळे त्यांना हा पराभव पचलेला दिसत नसून त्यांची नाराजी स्पष्ट होत आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी शेतकऱ्यांनो तुम्हीही…असं म्हणत शेतकऱ्यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या नाराजीवर भाष्य केलं आहे.

Raju Shetti
Raju Shetti : राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती पीक कर्ज माफी द्या, राजू शेट्टी आक्रमक

लोकसभा निवडणुकीत आधीपासूनच सांगली आणि 'हातकणंगले लोकसभा मतदारसंघ' चर्चेच्या अग्रस्थानी राहीला. येथे विद्यमान खासदार माने यांच्या संपर्कावरून लोक नाराज होते. तर राजू शेट्टी यांचा एकतर्फी विजय होईल असे मानले जात होते. मात्र तेथे ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच वंचितच्या उमेदवाराने देखील मतांचे विभाजन केल्याने त्याचा फटका शेट्टींना बसला. विजयाची गॅरंटी असणाऱ्या शेट्टींना मतदारांनीच नाकारल्याचे चित्र स्पष्ट होतं आहे. तर माने यांचा दणदणीत विजय झाला.

यंदा लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांना १ लाख ७९ हजार ८५० मतं मिळाली. शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. सत्यजित पाटील सरूडकर यांचा १४,७२३ मतांनी पराभव झाला. तर वंचितच्या उमेदवाराला ३२ हजार ६९६ मतं मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com