Pune News : देशात काहीच महिन्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळीस सुरूवात होणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडी आणि भाजपच्या महायुतीकडून जोरदार मोर्चे बांधणीस सुरूवात झाली आहे. दरम्यान भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यासह राज्यात जोरदार चर्चां रंगली आहे. मात्र या ऑफरवर शेट्टी यांनी सुचक इशारा देताना आपण हुरळून जाणार नाही असे म्हटलं आहे.
काहीच महिन्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळीस सुरूवात होणार आहे. त्यामुळे राज्यातही महायुती आणि महाविकास आघाडीत नेत्याची खेचाखेची वाढली आहे. भाजपकडून अनेक नेत्यांना सध्या भाजप प्रवेशाच्या ऑफर दिल्या जात आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे माजी दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे यांना भाजपकडून तशा ऑफर गेल्याची चर्चा रंगली आहे. अशातच भाजपने शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. तर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शेट्टी यांना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीत यावं सत्तेत सहभागी व्हावं अशी ऑफर देण्यात आली होती. त्यावर राजू शेट्टी यांनी मोजक्याच शब्दात आपली प्रतिक्रीय दिली आहे. त्यांनी मोठी ऑफर आली तरी हुरळून जाणार नाही असे म्हटलं आहे.
तसेच आपल्याशी या बाबात थेट कोणीही संपर्क साधलेला नाही. मात्र आडमार्गाने मध्यस्थामार्फत ऑफर देण्यात आली आहे. तसेच कामाबाबत केंद्रीय नेतृत्वाची भेट घ्यावी असे मध्यस्थामार्फत सांगावे धाडले जात आहेत. त्यावर आपण दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर आशा ऑफरमुळे विरघळून जाणारा मी काही लेचा पेचा नाही असेही शेट्टींनी म्हटलं आहे.
तसेच चळवळीतून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे ठरले आहे. त्यासाठी कोणत्याही आघाडीत जायाचं नाही असाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशा ऑफरमुळे विचलित होणार नसल्याचेही शेट्टींनी म्हटलं आहे.
दोन्ही खासदारांवर नाराजीचा सूर
कोल्हापूरमधील कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा मतदार संघावरून दररोज चर्चा होताना दिसते. येथे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोघेही शिवसेना फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे या दोन्ही खासदारांवर मतदारसंघात नाराजीचा सूर आहे.
कशासाठी संपर्क?
तर या दोन्ही जागा आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तसेच प्रयत्न मविआकडून देखील करण्यात येत आहेत. त्याअनुशंगाने राजू शेट्टी यांना भाजपकडून लोकसभेसाठी साकडं घालण्यात आले होते. तसेच शेट्टींनी महायुतीमध्ये सहभागी व्हावे यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडून संपर्क केला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.