Raju Shetti : '...शेतकऱ्यांसाठी मदत मागायला गेलो; राजकारणासाठी नाही' : राजू शेट्टी

Raju Shetti met Uddhav Thackeray : शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी ही भेट बुधवारी (ता. ३ रोजी) ‘मातोश्री’वर घेतली. यामुळे विविध राजकीय चर्चांना उत आला होता. मात्र यावर भाष्य करताना, उद्धव ठाकरे यांना, 'शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि अदानी समुहाला विरोध करण्यासाठी भेटल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची भेट ही राजकीय हेतूने घेतली नसल्याचेही ते म्हणाले.

पुढे शेट्टी म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची लढाई ही शेतकऱ्यांसाठी सुरू आहे. ते अदाणी उद्योग समुहाविरोधात लढत आहेत. त्याच अदानी उद्योग समुहाचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे.' 'केंद्र सरकारने अदानीच्या प्रेमापोटी खाद्य पदार्थाच्या आयतीवर ५ टक्के आयात शुल्क कमी केला. त्यामुळेच सोयाबिनला भाव नाही', असा हल्ला शेट्टी यांनी यावेळी केंद्रावर केला आहे.

तसेच 'सोयाबिनला जो दर २४ वर्षांपुर्वी मिळत होता. तोच दर आता केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबिनला आजही २४ वर्षे मागचा ४ हजारांचा दर मिळत आहे. मात्र पिकवण्याचा खर्च अफाट झाल्याचे', शेट्टी म्हणाले. 'यामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या २.५ टक्क्यांनी वाढल्या', असेही शेट्टी यांनी सांगितले.

Raju Shetti
Dalmia Sugars : दालमिया शुगर्स विरोधात राजू शेट्टी आक्रमक, उद्या कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन

मराठवाड्याचा दौरा

१५ जानेवारीपासून सोयाबिनच्या दर आणि कर्जमाफिच्या मुद्द्यावर मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाची अदाणी विरोधात सुरू असलेली लढाई आता शेतकऱ्यांचीही असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

पाटगावचे पाणी सिंधूदुर्गला

कोल्हापूर जिल्ह्यासह सिमावर्ती भागाला वेदगंगा नदी आणि पाटगाव धरण वरदान ठरले आहे. पण आता त्यावरच घाट सरकारने घालण्याचे ठरवले आहे. पाटगाव धरणाचे पाणी हे आदानी समुहाला देण्याचा घाट सरकारचा आहे. त्याचे पाणी ८४०० कोटी खर्च करून आदानी समुह सिंधूदुर्ग जिल्ह्यात नेत आहे. त्यामुळे सिमा भाग आणि कर्नाटकमधील जनतेच्या शेतीला पाणी कमी पडणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे.

पाणी कशासाठी?

वेदगंगा नदीवर असणाऱ्या पाटगाव धरणाचे पाणी हे आदानी समुहाच्या विजनिर्मिती केंद्राकडे नेणार आहे. ते पाणी २१०० मेगावॅटची विज निर्मिती केंद्रासाठी वापरली जाणार आहे.

Raju Shetti
Sugarcane Rate : मंत्री मुश्रीफांचा फोन तरी देखील राजू शेट्टी आंदोलनावर ठाम !

सहा जागा लढवणार पण मविआत नाही

दरम्यान शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवणार असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली. तसेच 'आपण मविआत सहभागी होणार नाही असेही त्यांनी सांगितले. आम्ही स्वतंत्रपणाने निवडणूक लढवणार आहोत आणि त्याचा पुनर्विचार करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही', अशी स्पष्ट भूमिका शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मांडली.

तुपकरांच्या घोषणेवर

शेतकरी संघटनेचे बुलढाण्यातील नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा लढविण्याची घोषणा केली होती. तसेच संघटनेकडून लढणार की दुसऱ्या पक्षाची कास धरणार यावर त्यांनी भाष्य केले नव्हते. त्यावरून, 'तुपकर निवडणूक लढवण्याचा विचार करत असतील, तर चांगलंच आहे. आम्ही स्वागत करतो. पण, त्यांनी संघटनेकडून निवडणूक लढवावी', अशी अपेक्षीही शेट्टींनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com