CM Revanth Reddy : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडून चौथ्या टप्प्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा

Telangana Farm Loan Waiver : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कर्जमाफीच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. या घोषणेमुळे राज्यातील ३.१ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
Revanth Reddy
Revanth Reddy Agrowon
Published on
Updated on

Pune News : तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी नुकताच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. रेड्डी यांनी चौथ्या टप्याची घोषणा केली असून याचा फायदा ३.१ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तर राज्याच्या तिजोरीवर २ हजार ७४७ कोटींचा बोजा पडणार आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी महबूबनगर येथील शेतकरी महोत्सवाच्या जाहीर सभेत ही घोषणा केली.

तेलंगणात काँग्रेसने सरकार सत्तेवर आल्यास शेतकरी कर्जमाफी करू अशी हमी दिली होती. यानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांनी पहिल्या तीन टप्प्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. तर यासाठी सुमारे १८ हजार कोटी खर्च करण्यात आले असून याचा २२.२ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. तर आता नव्या घोषणेमुळे शेतकरी कर्जमाफीचा खर्च २१ हजार कोटींपर्यंत पोहचला आहे. तर या योजनेमुळे राज्यातील तब्बल २५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे.

Revanth Reddy
K.Chandrasekhar Rao : तेलंगानात राजकारण तापले? शेतकऱ्यांची नाराजी; माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेवर निशाना

रेड्डी यांनी चौथ्या टप्प्यातील कर्जमाफीची घोषणा अशा वेळी केली आहे. जेव्हा बीआरएस आणि भाजपने पहिल्या तीन टप्प्यातून लाखो शेतकऱ्यांना वगळ्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला होता.

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे पाऊल

तेलंगणातील काँग्रेस सरकारला ७ डिसेंबर रोजी १ वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने शनिवारी शेतकरी महोत्सवाचे (रयथू पांडुग) आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्जमाफीच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करताना रेड्डी म्हणाले की, हे पाऊल काँग्रेसच्या शेतकऱ्यांप्रती समर्पण आणि समर्थन दर्शवते. यावेळी रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बीआरएसचे नेते माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना खुले आव्हान दिले. तसेच योजनेबद्दल काही शंका असेल तर खुल्या चर्चेसाठी यावे, असे ही म्हटले आहे.

Revanth Reddy
Telangana Loan waiver : तेलंगणा सरकारनं पुन्हा सुरू केली शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी| ॲग्रोवन

यावेळी रेड्डी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर तेलंगणा हे एकमेव असे राज्य आहे, ज्याने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत शेतकऱ्यांचे २१ हजार कोटींचे पीक कर्ज माफ केले आहे. पण शेतकऱ्यांना मदत करण्यात भाजप आणि बीआरएस मागे का राहिली?, असाही सवाल रेड्डी यांनी यावेळी केला आहे. तर बीआरएस सरकारने पहिल्या टर्ममध्ये कर्जमाफी केली. त्यांनी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. मात्र फक्त ११ हजार कोटींचीच कर्जमाफी झाल्याचा दावा रेड्डी यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांप्रती काँग्रेसची बांधिलकी

यावेळी रेड्डी यांनी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी उभी राहिली असून भविष्यातही तशीच राहील असेही मुख्यमंत्री रेवंत यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com