Raju Shetti : बैलगाडीतून जात राजू शेट्टींनी दाखल केला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज; जोरदार शक्तीप्रदर्शन

Lok Sabha 2024 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (दि.१५) लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
Raju Shetti
Raju Shettiagrowon

Lok Sabha 2024 Hatkanangle : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (दि.१५) लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विराट शक्तीप्रदर्शन केले. दसरा चौकातून निघालेला जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. राजू शेट्टी यांनी बैलगाडीने जात उमेदवारी अर्ज दाखल केला.

दसरा चौक येथे शेट्टी यांनी सभेला संबोधित केले, सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, जयंत पाटील आणि सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. खोक्याचा बाजार करणारी झुंड आणि कारखानदार हे माझ्या विरोधात उभे आहेत. परंतु माझ्याकडे सर्वसामान्य माणसे, विचारवंत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

याचबरोबर जिल्ह्यातील सगळे कारखानादार हातकणंगलेमध्ये काड्या करण्यात सामील असल्याचा आरोपही शेट्टींनी केला. दरम्यान ठाकरे गटाकडून उमेदवार देणार नसल्याचे सांगण्यात येत होते परंतु अचानक चाव्या कोठून फिरल्या माहीत नाही, या चाव्या जयंत पाटलांकडून फिरल्या की सतेज पाटील यांच्याकडून फिरल्या हे पहावे लागेल असा टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणले की, विरोधकांतील काहीजण ईडीला घाबरून जातील भाजपत जात आहेत, पण ईडीला मी हिंगलत नाही, मला पाठवावी नोटीस एकदा, असे आव्हान त्यांनी दिले. ईडी कार्यालयावरच मोर्चा काढावा अशी परिस्थिती, असल्याचे ते म्हणाले.

Raju Shetti
Raju Shetti : 'साखर कारखानदारांच्या षडयंत्राला शेतकरीच अस्मान दाखवतील'

देशांमध्ये बेरोजगारीची टक्केवारी सर्वाधिक आहे. त्यामुळे आर्थिक धोरणे बदला, त्याशिवाय बेरोजगारी हटणार नाही असे यावेळी सांगितले. दरम्यान, बेरोजगारीवर निवडून आल्यानंतर संसदेत आवाज उठवू तसेच विरोधकांमधील काहीजण ईडीला घाबरून भाजपमध्ये जात आहेत. मात्र, मी ईडीला हिंगलत नाही. मला नोटीस पाठवावी एकदा असे आव्हानही शेट्टी यांनी दिले.

७ मे नंतर ईडी कार्यालय विरोधात मोर्चा काढावा अशी परिस्थिती असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून यापुढे विद्यार्थी आणि बेरोजगारांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com