Raju Shetti : ...आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराच; लाडक्या बहिणींनाही सरसकट २१०० रुपये द्या; राजू शेट्टी यांचा मागणी

Raju Shetti On Mahayuti : विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीतील नेत्यांनी शेतकरी आणि राज्यातील महिलांना आश्वासने दिली होती. ती आता सरकार आल्यावर पूर्ण करा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
Raju Shetti On Mahayuti
Raju Shetti On Mahayuti Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील पार पडलेल्या विधानसभेत महायुतीला मोठे यश मिळाले. हे यश राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांमुळे मिळाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मान्य केलं आहे. यावरून मंगळवारी (ता.२६) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुतीला डिवचले आहे. शेट्टी यांनी, महायुतीने घोषणेप्रमाणे आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावच तसेच लाडक्या बहिणींना २१०० रूपये द्यावेत अशी मागणी सांगलीत बोलताना केली आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, तर महिल्यांच्या खात्यात २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. यानंतर निकाल लागला असून आता महायुतीचीच सत्ता पुन्हा एकदा राज्यात येणार आहे.

Raju Shetti On Mahayuti
Farmers Debt relief : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत माहिती चुकल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा

लाडक्या बहिणींना डिसेंबरपासून पैसे द्या

महायुतीचे नेते एक वचनी रामाचे भक्त असून रामाने कधीच आपले वचन मोडलेले नव्हते. यामुळे आता महायुतीचे सरकार आल्यावर राज्यातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. तसेच सर्वच लाडक्या बहिणीला २१०० रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे, अशाही मागणीही शेट्टी यांनी केली आहे.

महायुतीचे नेते प्रचारावेळी राज्यातील सरसकट सर्व बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेची रक्कम टाकण्याची ग्वाही देत होते. पण आता नव्या आदेशाप्रमाणे केवळ २२ टक्के बहिणी योजनेसाठी पात्र ठरतील, अशी शक्यता आहे. मतदानाआधी एक आणि आता मते घेतल्यानंतर एक असे महायुती वागत असून लाडक्या बहिणींमध्ये भेदभाव करण्याचे काम महायुती करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

Raju Shetti On Mahayuti
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे याच महिन्यात मिळतील; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

भाऊबीज परत घेणे शोभत नाही

राज्यातील बहिणींनी मतदानावेळी महायुतीला भरभरून मते दिलेली असून आता ताटात टाकलेली भाऊबीज काढून घ्यायची नसते. हे महायुतीला शोभत नाही, असाही टोला शेट्टी यांनी महायुतीला लगावला आहे.

मुख्यमंत्रीपद भाजपचेच

विधानसभा निवडणुकीचा निकाल आला असून भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत. आतातर अजित पवार गटाने देखील पाठिंबा दिला आहे. यामुळे संख्याबळ पाहता मुख्यमंत्री पदावर भाजपचाच अधिकार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

ईव्हीएम बाबत राज्यकर्त्यांनी उत्तर द्यावीत

तसेच राज्यात सुरू असणाऱ्या ईव्हीएम गोंधळावर शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना, ईव्हीएम संपूर्ण देशातून हटवायला हवे असे म्हटले आहे. अमेरिकेसारखा डिजिटल क्रांतीचा देश आजही मतपत्रिकेवर मतदान घेतो. मग भारताला बॅलेट पेपरचा विचार करण्यास काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. ईव्हीएम बाबत राज्यकर्त्यांनी समोर येऊन उत्तर देताना एकदा एकदा बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी दाखवावी, असे आवाहन देखील राजू शेट्टी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com