Farmers Debt relief : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत माहिती चुकल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा

Maharashtra Government : राज्य सरकारने वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय घेतला.
Farmers Debt relief
Farmers Debt reliefagrowon
Published on
Updated on

Maharashtra Government : राज्य सरकारने वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता परंतु ३३ हजार ६६७ शेतकऱ्यांचा प्रश्‍न प्रलंबितच राहण्याची शक्यता आहे. शिवाय राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती अपलोड करताना झालेल्या चुकांमुळे पाच हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. जिल्हा बँकेतील काही शेतकऱ्यांनाही अशीच अडचण आली आहे.

या अडचणीमुळे पात्र असताना अपात्र झालेले शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये हेलपाटे मारत आहे. या पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

याबाबत जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे म्हणाले की, मृत वारसांचा डेटा अपलोड केला जाईल. ११ हजार लाभार्थ्यांसह मृत वारस यांचा लाभ दहा दिवसांत मिळेल. राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये ३१ मार्च वर्षअखेर असल्यामुळे मार्चपूर्वी पीक कर्ज उचल झालेले असे शेतकरी अपात्र आहेत. असा नियम असून, सॉफ्टवेअर अशा पद्धतीचे आहे.

राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २७ डिसेंबर २०१९ पासून परिपत्रक काढून लाभ देण्यास सुरुवात झाली. यामध्ये तीन लाख ८८५ खातेदार शेतकऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यात आली होती. यामध्ये एकच वर्षात दोनवेळा पीक कर्ज उचल केलेले शेतकऱ्यांच्या अन्याय झाला होता. नुकतेच ११ हजार २१ शेतकऱ्यांचे नव्याने थंब घेण्यात आले आहेत.

Farmers Debt relief
सुधारित तंत्रज्ञानातून उन्हाळी भुईमूग ठरतोय फायदेशीर

यामध्ये ३३ हजार ६६७ शेतकऱ्यांची अपात्र यादी आहे. टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे २९ हजार, तर राष्ट्रीयीकृत बँकेच्या सुमारे पाच हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात तीन वर्षे पैकी दोनवेळा पीक कर्ज असलेले शेतकऱ्यांचे स्टेटमेंट अपलोड करताना चुका झाल्या आहेत, असे चित्र आहे. तसेच ३१ मार्च वार्षिक आर्थिक वर्षअखेर असल्यामुळे यामध्ये सुद्धा असे शेतकरी अपात्र झाले आहेत. या राष्ट्रीयीकृत बँकेतील अपात्र शेतकऱ्यांचा फेरसर्व्हे होऊन पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.

वंचित राहिलेल्या अकरा हजार एकवीस शेतकऱ्यांच्या बरोबर मृत वारस यांना लाभ देण्यासाठी सध्या पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ५७७ शेतकऱ्यांचा समावेश असून, आधार प्रमाणिकरण झाले, मात्र ३९ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com