Raju Shetti : 'अन्यथा २६ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद', राजू शेट्टींचा इशारा

Central Government : केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वपरूपी प्रशासकाची नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
Raju Shetti
Raju Shettiagrowon

Raju Shetti vs Central Government : केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वपरूपी प्रशासकाची नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा २६ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयास विरोध करणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

यावेळी शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकार कृषी धोरणाबाबत अनेक चुकीचे निर्णय घेत आहे. ज्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सध्या केंद्र सरकारने देशातील बाजारसमित्यांच्या निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासक नेमून कारभार करण्याचा निर्णय घेत आहे. शासन नियुक्त प्रशासक मंडळ म्हणजे सात बारा नावावर असणारे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि निवडणुकीला देणग्या देणारे व्यापारी हेच त्या प्रशासक मंडळामध्ये असतील.

या निर्णयाने बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण होणार असून बाजार समितीतील शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. देशातील बाजार समित्या या राजकारण्यांचे अड्डे बनलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र याकरिता शेतकऱ्यांचे अधिकारावर गदा आणत कायमस्वरूपी प्रशासक नेमणूक करणे म्हणजे ढेकूण झाले म्हणून घर जाळण्यातला प्रकार असल्याचे शेट्टी म्हणाले.

केंद्र सरकारने बाजार समितीवर प्रशासक न नेमता सध्या असलेल्या निवडणुक प्रक्रियेतही सुधारणा करून यामध्ये बदल करून संबधित बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या दबावाखाली कारभारावर नियंत्रण राहिल. तसेच बाजार समितीत काम करणारे माथाडी, हमाल आणि व्यापारी यांचेही प्रतिनिधींचा यामध्ये समावेश असणे गरजेचे आहे.

Raju Shetti
Raju Shetti : राजू शेट्टींना भाजपचे साकडे; शेट्टी म्हणाले, 'मी काही लेचा...'

कांदा निर्यात बंदीबाबत शेतकऱ्यांची चेष्टा

केंद्र सरकारने बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधा, अवैद्य व भ्रष्ट कारभारावर आळा घालण्यासाठी नवीन धोरण यासारख्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. तसेच केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्ठा चालविली असून कांद्यावरील निर्यात बंदी उठविली म्हणून अनेकजणांनी जाहीरातबाजी केली. मात्र लोकसभा निवडणुका डोळयासमोर ठेवून केंद्र सरकारने ३१ मार्च पर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवली असल्याचे जाहीर केले आहे.

व्यापारी, तस्कर व दलाल यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. यामुळे बाजार समिती व कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बाजार समित्या बंदची हाक पुकारण्यात आली असून याकरिता राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनास राज्यातील सर्व बाजार समित्यांनी तसेच माथाडी, हमाल आणि व्यापारी यांनीही या आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com