Farmer Accident Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचा अनेकांना लाभ, कोट्यावधी रुपयांचा लाभ

Gopinath Munde Shetkari Yojana : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २३.३७ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली.
Farmer Accident Scheme
Farmer Accident Schemeagrowon
Published on
Updated on

Maharashtra Government : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २३.३७ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून २३.३७ कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

काय आहे ही योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्रात २०१५- २०१६ पासून कार्यान्वित होती. परंतु शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेत अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. विमा कंपन्यांकडून दवे वेळेवर निकाली काढण्यात येत नव्हते. यामुळे या योजनेत पात्र शेतकऱ्यांचे देखील नुकसान होत होते. आता राज्य शासनाकडून १९ एप्रिल २०२३ पासून ही योजना सानुग्रह अनुदान तत्वावर राबवण्यात येणार आहे.

यापुढे शासन कृषी विभागाच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवणार आहे. तसेच पुढील ३ वर्षासाठी हि योजना कार्यान्वित असेल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस 2 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळू शकणार आहे.

Farmer Accident Scheme
Drought Rural Maharashtra : दुष्काळाचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर, कर्जाच्या उचलीस शेतकरी धजावतोय

हे अपघात योजनेसाठी पात्र

शेतकऱ्याचा खालीलपैकी कोणत्याही कारणाने मृत्यू झाला असल्यास योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला अर्ज करता येणार आहे. रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश नक्षलाईकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल हे पात्र होतील.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

सातबारा उतारा

मृत्यूचा दाखला

शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार वारसाची नोंद

शेतकऱ्याच्या वयाची खात्री होईल यासाठी त्याचे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र

मृत्यूचा प्रथम माहिती अहवाल (FIR) किंवा स्थळ पंचनामा किंवा पोलीस पाटलाचा अहवाल

वारसदाराचे आधार कार्ड आणि बँक पासबूक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com