Mango Crop Damage : पावसाळी वातावरणामुळे आंब्याच्या विक्रीवर परिणाम

Mango Rain Damage : कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपल्यानंतर साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये केशर आंबा बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल होतो.
Hapoos Mango Prices
Hapoos Mango Pricesagrowon
Published on
Updated on

राजकुमार घाडगे ः सकाळ वृत्तसेवा

Pandharpur Rain : पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये मागील आठवडाभरापासून दररोज पूर्वमोसमी पाऊस बरसत आहे. पावसाळी वातावरणामुळे आंबा विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला असून, येथील भाजी बाजारामध्ये आंबा विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान, ग्राहकांनी पाठ फिरवल्याने आंबा बागायतरांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यामध्ये एकूण ४९० हेक्टर क्षेत्रावर केसर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. डाळिंब, द्राक्ष व केळी या फळबागांनंतर मोठ्या प्रमाणावर केशर आंब्याची सर्वत्र लागवड करण्यात आली आहे. कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपल्यानंतर साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये केशर आंबा बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल होतो. अतिशय मधुर चव असलेल्या केशर आंब्याला ग्राहकांकडून मोठी मागणी असते.

Hapoos Mango Prices
Mango Orchid: आंबा लागवडीचं योग्य अंतर किती असावं?

यंदा देखील मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही प्रमाणामध्ये केसर आंबा बाजारात दाखल झाला होता. त्या वेळी शंभर ते दीडशे रुपये किलो या दराने आंब्याचे विक्री केली जात होती. दुसऱ्या टप्प्यातील केसर आंबा १० ते १२ मेच्या आसपास बाजारामध्ये विक्री साठी आला. मात्र १४ मेपासून पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये जवळपास दररोज अवकाळी पाऊस पडत आहे. पावसाळी वातावरणामुळे आंबा विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

नवी पेठेतील भाजी बाजार व इंदिरा गांधी मंडईमधील फळ विक्रेत्यांकडे केसर आंब्यासह कर्नाटकातील पायरी, लालबाग, बेनिषा, मल्लिका आदी जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. केसर आंबा ६० ते १०० रुपये तर इतर प्रजातीच्या आंब्याचे पन्नास रुपये किलो विक्री दर आहेत. पाऊस पडण्याआधी जो केसर आंबा १०० ते १५० रुपये किलोने विकला जात होता त्याचे दर सध्या निम्म्यावर आले आहेत. तरी देखील केशर आंब्याची अपेक्षित विक्री होत नसल्यामुळे आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मी मागील २५ ते ३० वर्षांपासून इंदिरा गांधी मंडई मध्ये विविध प्रकारची फळे विक्री करत आहे. आजतागायत कधीही मे महिन्यामध्ये सलग इतके दिवस पाऊस पडला नव्हता. यावर्षी मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज पाऊस पडत आहे.

-नजीर बागवान, फळ विक्रेते,

आमची तीन एकरामध्ये केशर आंब्याची ५०० झाडे आहेत. यंदा आमचा केशर आंबा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विक्री योग्य झाला. मात्र सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे आंब्याची अपेक्षित विक्री झालेली नाही. यावर्षी उत्पादन खर्च देखील न निघाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

- दीपक घोगरदरे, आंबा बागायतदार, भंडीशेगाव, पंढरपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com