Beed Rainfall : बीडमध्ये समाधानकारक पाऊस नाही

Monsoon Rain Update : यंदा मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उन्हाळ्यातील टंचाईतून दिलासा मिळाला.
Tamhini Ghat Rainfall
Tamhini Ghat RainfallAgrowon
Published on
Updated on

Beed News : यंदा मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उन्हाळ्यातील टंचाईतून दिलासा मिळाला. तसेच तलावांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली. मात्र, खरीप हंगामात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मागीलवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत निम्माच पाऊस झाला आहे.

मागच्या वर्षी (ता. ३१ जुलै) ३९७ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत १९९.१ मि.मी. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा निम्मा (१९८ मिलिमीटर कमी) पाऊस झाला आहे. आजघडीला मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ३४ टक्के (२७६.१०६ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा आहे.

Tamhini Ghat Rainfall
Maharashtra Rain Forecast : ऑगस्टमध्ये कमजोर, सप्टेंबरमध्ये वाढणार जोर

यंदा सुरवातीच्या पावसानंतर सव्वा महिना खंड पडला. मागच्या आठवड्यात सलग आठ दिवस चांगला पाऊस झाला. पण, पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. परिणामी पेरण्याही यंदा उशिराने झाल्या. आता खरीप हंगामातील पेरण्या उरकल्या असल्या, तरी दमदार पावसाची गरजच आहेच.

Tamhini Ghat Rainfall
Monsoon Rain: विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच राहणार

जिल्ह्यात आठ लाख आठ हजार ९४६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या अपेक्षित हेात्या. तेवढ्या पेरण्या झाल्या आहेत. यात सव्वातीन लाख हेक्टरवर कापूस लागवड, तर तेवढ्याच क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यासह तूर, उडीद, मूग, ज्वारी, मका, बाजरी व कडधान्य तसेच तृणधान्याची पेरणी झाली आहे.

मे महिन्यात २२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पावसाळी हंगामात (जून व चालू महिन्यात) केवळ १९९.१ मि.मी. (वार्षिक सरासरीच्या ३५.२ टक्के) एवढाच पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी (३१ जुलै) तब्बल ३९७ मि.मी. पाऊस झाला होता. आष्टी तालुक्यात केवळ १०८.३ मि.मी. पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com