Kolhapur Kharif Sowing : कोल्हापुरात ५३ हजार हेक्टरवर पेरा

Kharif Season 2025 : मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात बागायत पिकांचे १८५९.३५२ हेक्टरवरील नुकसान झाले आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार ५८० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. काही भागांत पावसाने उघडीप दिल्याने वाफसा आलेल्या ठिकाणी पेरणी करण्यात येत आहे. परंतु काही ठिकाणी जमिनीतील ओलावा कमी झाला नसल्याने खरीप हंगामासाठी जमिनीची पूर्वमशागत करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात भाताची धूळवाफ पेरणी केली जाते, तसेच उर्वरित क्षेत्रामध्ये रोपलागण केली जाते. घात आलेल्या क्षेत्रावर पेरण्यांना सुरुवात झाली आहे.

मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात बागायत पिकांचे १८५९.३५२ हेक्टरवरील नुकसान झाले आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : यवतमाळमध्ये दहा हजार हेक्टरवर खरीप पेरा

यामध्ये भुईमूग, भाजीपाला, केळी, मका, उन्हाळी भात, सूर्यफूल, ऊस, तीळ, मिरची फुलपिके, उन्हाळी उडीद, मूग, सोयाबीन, कांदा व इतर पिकांचा समावेश आहे. फळ पिकाखालील ९.७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये आंबा, पेरू, काजू व इतर पिकांचा समावेश आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : पावसाच्या भरवशावर पेरण्या केलेल्यांचे डोळे आकाशाकडे

दृष्टिक्षेपात पेरणी (हेक्टर)

भात २५,५४४, ज्वारी १५७, नाचणी रोपवाटिका ५१४, मका ३४, भुईमूग ७,०९६, सोयाबीन २०,१४६, तूर, मूग, उडीद व इतर कडधान्ये ७४ एकूण ५३,५८० हेक्टर उसाचे सर्वसाधारण १ लाख ९८ हजार ६०४ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. हातकणंगले, शिरोळ व पन्हाळा तालुक्यात आडसाली हंगामपूर्व लागणीची कामे सुरू आहेत. आजअखेर १,०९३ हेक्टर क्षेत्रावर लागण झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी

क्षेत्र (हेक्टर)

हातकणंगले ७,७६२

शिरोळ ४३०

पन्हाळा २,५९८

शाहूवाडी ३,१४१

राधानगरी २,०९४

गगनबावडा १८

करवीर २,६४०

कागल ९,२०५

गडहिंग्लज १६,७१६

भुदरगड ५,८५२

आजरा २,३३६

चंदगड ७८८

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला आहे. वाफसा आल्यास मशागत करून शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण कराव्यात. खरिपासाठी आवश्यक खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये.
- एन. एस. परीट, कृषी उपसंचालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com