Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Kharif Sowing : पावसाच्या विश्रांतीमुळे पेरण्या रखडल्या

Kharif Season : खरीप हंगामाची सुरुवात होताच पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी त्यानंतरच्या विश्रांतीमुळे पेरण्या संथगतीने सुरू आहेत.
Published on

Dhule News : खरीप हंगामाची सुरुवात होताच पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी त्यानंतरच्या विश्रांतीमुळे पेरण्या संथगतीने सुरू आहेत. जिल्ह्यात यंदा सात लाख आठ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य आहे.

आतापर्यंत केवळ दोन लाख आठ हजार ९६० हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच २९.४८ टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली. सद्यःस्थितीत पुरेसा व नियमित पाऊस झाल्यास पेरणीचा वेग वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे.

Kharif Sowing
Akola Kharif Sowing : पावसाचा जोर नसल्याने पेरण्या रखडल्या

पावसाच्या अनियमिततेमुळे काही भागांत वाफसा नसल्याने, तर काही भागांत मशागतीची कामे अपुरी राहिल्याने पेरणी रखडल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अभ्यास करूनच योग्य पिकांची निवड करण्याचे आवाहन केले आहे.

Kharif Sowing
Sangli Kharif Sowing : सांगलीत खरीप पिकांची ८५ हजार हेक्टरवर पेरणी

पेरणीची स्थिती

जिल्ह्यात कापूस व मका या पिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कापसाची पेरणी दोन लाख आठ हजार ४८० हेक्टरवर (२९.४२ टक्के), तर मक्याची पेरणी एक लाख ८० हजार ९६७ हेक्टरवर (३२.८७ टक्के) झाली आहे. दुसरीकडे, तांदळासाठी राखीव असलेल्या एक हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर अद्याप एकही पेरणी झालेली नाही.

साक्री तालुक्यात पावसाची हजेरी लागली असली, तरी वाफसा न झाल्याने पेरणीस अडथळा येत आहे. नाचणीचे उत्पादनही याच भागात घेतले जाते, परंतु सध्या कोणतीही हालचाल नाही.

धुळे जिल्हा : प्रमुख पीकपेरणी स्थिती (२० जूनअखेरची माहिती, हेक्टरमध्ये)

पीक पेरणी क्षेत्र टक्केवारी

कापूस २,०८,४८० २९.४२

मका १,८ ०,९६७ ३२.८७

तांदूळ राखीव १,५०० ००

ऊस राखीव ८,९०० ००

नाचणी पेरणी सुरू नाही ००

तालुकानिहाय पेरणी टक्केवारी

तालुका टक्केवारी

शिंदखेडा ३०.६४

धुळे ३०.५४

शिरपूर २८.४८

साक्री २८.४७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com