Rain Alert : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा मंडलांत अतिवृष्टी

Heavy Rain Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासात सर्वदूर हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला.
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासात सर्वदूर हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. सहा मंडलांत अतिवृष्टी झाली. गंगापूर, कन्नड, वैजापूर तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता.

गत काही दिवसापासून मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची स्थिती आहे. मध्यंतरी दिलेल्या खंडामुळे पाऊस येतो की नाही अशी स्थिती होती. आता मात्र तीन-चार दिवसापासून पडत असलेल्या पावसाने अनेक भागांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

Rain Alert
Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सरासरी २१.७ मिलिमीटर, पैठणमध्ये १३.५ मिलिमीटर, गंगापूरमध्ये ४६ मिलिमीटर, वैजापूरमध्ये २७.४ मिलिमीटर, कन्नडमध्ये २५.८ मिलिमीटर, खुलताबादमध्ये ३.२ मिलिमीटर, सिल्लोडमध्ये १२.४ मिलिमीटर, सोयगावमध्ये १४.२ मिलिमीटर तर फुलंब्री तालुक्यात सरासरी ७ मिलिमीटर पाऊस झाला.

Rain Alert
Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढला

अतिवृष्टीची मंडले

शेंदूरवादा ९४.३, वाळूज ७०.८, जामगाव ८१, देवगाव ७५, पिशोर ६९.८, महालगाव ७७.४.

पावसाची मंडले (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर २८, उस्मानपुरा २७.५, कांचनवाडी ३८.८, चित्ते पिंपळगाव २१.८, लाडसावंगी ३६.८, पंढरपूर २४.५, ढोरकिन ३४.३, गंगापूर ६१.८, मांजरी ६०, भेंडाळा ४८.८, तुर्काबाद ५६, सिद्धनाथ वडगाव २८.८, खंडाळा २८.३, शिवूर ३०, बोरसर ३०, लोणी ३९, नागमठाण ४५.५, घायगाव २६.५, जानेफळ २८, कन्नड ५३.५, चापानेर ५३.५, चिखलठाण ३८.३, चिंचोली ३९.८, करंजखेड ३९.८, नागद ३४, उंडणगाव ३५.८, शिवना २१.३, सावलदबारा ३१.

जालना, बीड जिल्ह्यात पावसाच्या सरी

शुक्रवारी सकाळपर्यंत २४ तासात छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता जालना जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला या जिल्ह्यात सरासरी १०.४ मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची सर झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com